काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाजले : महापौरांविरोधात नगरसेवकांची विश्वजित कदमांकडे तक्रार

त्यानंतर महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत राष्ट्रवादीने काँग्रेसला डावलण्यास सुरवात केली.
Congress corporator lodges complaint against Sangli mayor with Vishwajit Kadam
Congress corporator lodges complaint against Sangli mayor with Vishwajit Kadam

सांगली : मोठा गाजावाजा करून भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम करत सांगली महानगरपालिकेत सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये वाजायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे एकतर्फी निर्णय घेत आहेत. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना विश्‍वासात घेतले जात नाही. ऑनलाईन महासभेत अनेक भानगडीचे विषय घुसडवतात, असा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांवर केला आहे. सूर्यवंशी यांच्याविरोधात काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाचे नेते तथा राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्याकडे तक्रार केली आहे. (Congress corporator lodges complaint against Sangli mayor with Vishwajit Kadam)

भारतीय जनता पक्षाची सांगली महानगरपालिकेतील सत्ता उलथवून टाकत भाजपचेच नगरसेवक फोडून महापालिकेत सत्ता मिळवणाऱ्या काँग्रस आघाडीमध्ये अवघ्या सहा महिन्यांतच बेबनाव निर्माण झाला आहे. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर झाले. मात्र, त्यानंतर महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत राष्ट्रवादीने काँग्रेसला डावलण्यास सुरवात केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या अनेक निर्णयांबाबत काँग्रेसच्या नगरसेवकांना अंधारात ठेवण्यात आल्याचे आरोप झाले आहेत. काँग्रेस नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले आदींनी उघडपणे राष्ट्रवादीच्या कारभाराबद्दल राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. ऐनवेळच्या ठरावात आणखी किती ठराव केले असतील, अशी शंकाही काँग्रेसच्या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांची काँग्रेसच्या नगरसेवकांनी भेट घेऊन राष्ट्रवादीच्या कारभाराबाबत तक्रारी केल्या आहेत. डॉ. कदम यांनी तक्रारी ऐकून पुढील आठवड्यात बैठक घेऊन, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करू, अशी ग्वाही दिल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

 झेडपीच्या ऑफलाईन सभेसाठी भाजपचे सदस्य आक्रमक

सांगली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २१ जून रोजी ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन सभेत प्रश्न मांडण्यात अडचणी येतात. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाला आहे. त्यामुळे सभा ऑफलाईनच घेण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे सदस्य अरुण राजमाने, अरुण बालटे, सरदार पाटील आदी आक्रमक झाले आहेत. त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे महादेव पाटील व राष्ट्रवादीचे अर्जुन पाटील यांनीही तशी मागणी केली आहे. दरम्यान कोरोनाच्या साथीमुळे ऑनलाईन सभेचे नियोजन केले आहे, मात्र संसर्ग कमी झाल्यास ऑफलाईन सभा घेतली जाईल, असे अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी सांगितले.

राजमाने म्हणाले,‘‘सभागृहाचे शेवटचे सहा महिन्यांत कामे तत्काळ मार्गी लागली पाहिजेत, अशी सर्वच सदस्यांची अपेक्षा आहे. यापूर्वीची अनेक कामे प्रलंबित आहेत. वारंवार याबाबत सांगूनही जाणीवपूर्वक मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाच्या तिसरी लाटेसाठी चर्चा करून कडक उपाययोजनांची गरज आहे. मात्र ऑफलाईन सभा घेऊन आमचे तोंड दाबण्यासाठी काहीजण जाणीवपूर्व षडयंत्र रचले जात आहे. ऑनलाईनमध्ये नेटवर्किंगची अडचणी येऊ शकतात.’’

याबाबत अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या,‘‘कोरोनाच्या साथीमुळे २१ जून रोजी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कालावधीत संसर्ग कमी झाल्यास ऑफलाईन सभा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com