रूग्णालयाच्या चुकीमुळे लहान मुलांना धोका...

नर्सचा कोरोनाचे रिपोर्ट येण्यापूर्वी चार ते पाच दिवस लहान मुलांच्या वार्डमध्ये तिला काम करण्याची जबाबदारी दिली होती.
1mla_nitesh_rane_2_0
1mla_nitesh_rane_2_0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या परिचारिकेने लहान मुलांच्या वार्डमध्ये काम केल्याच्या धक्कादायक प्रकार नुकताच घडला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. या नर्सचा कोरोनाचे रिपोर्ट येण्यापूर्वी चार ते पाच दिवस लहान मुलांच्या वार्डमध्ये तिला काम करण्याची जबाबदारी दिली होती. 


लहान मुलांच्या जीवाशी आरोग्य विभाग खेळत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे लहान मुलांचा जीव धोक्यात आहे, या सर्व लहान मुलांची कोरोना टेस्ट व्हावी, अशी मागणी राणे यांनी लावून धरली आहे. याबाबत सिव्हिल सर्जन डॅा. धनंजय चाकूरकर यांची चैाकशी करून राज्य सरकारने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना राणे यांनी दिले आहे.


कोरोना वार्डमध्ये ड्यूटी संपल्यानंतर या नर्सला लहान मुलांच्या वार्डात ड्यूटी दिली होती. दरम्यान, त्या नर्सच कोरोना अहवाल येईपर्यंत तिला विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे होते, पण रूग्णालय प्रशासनाने तसे न करता तिला लहान मुलांच्या वार्डात ड्यूटी दिली. येत्या पावसाळी अधिवेशनात सिव्हिल हॉस्पिटलच्या हलगर्जीपणाबद्दल आवाज उठविणार असल्याचे राणे सांगितले.

ही बातमी वाचा : राष्ट्रवादीचे चाणक्य म्हणतात, 'परदे में रहने दो'  

पुणे : राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असले की राजकीय भूंकप होतो, अशी चर्चा नेहमीचं होते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले तरीही, भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांच्या त्या निर्णयाचे कवित्व अजून संपलेले दिसत नाही. याबाबत एका वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना प्रफुल्ल पटेल यांना राज्यात झालेल्या सत्तांतरावेळी घडलेल्या राजकीय नाट्याबाबत विचारले असता ते म्हणाले की 'आता सगळं काही घडून गेले आहे, त्या विषयाबत चर्चा करणे अयोग्य आहे. त्यात लपविण्यासारखे काहीचं नाही. काही गोष्टीवर पडदा असलेला बरा. भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय हा स्वत: अजित पवार यांचाच होता. त्याचा पक्षांशी संबध नव्हता.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com