मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले विश्वजीत कदमांचे कौतुक 

मदतीबाबत तुम्ही काळजी करू नये.
Chief Minister Uddhav Thackeray lauded Vishwajeet Kadam
Chief Minister Uddhav Thackeray lauded Vishwajeet Kadam

अंकलखोप (जि. सांगली) : चिंता करू नका. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. नागरिकांनी स्वतः स्थलांतरित होऊन प्रशासनास मदत केली आहे, त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे. झालेल्या नुकसानीबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीचे धोरण ठरवून मदत तातडीने देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  काल सांगलीत दौऱ्यावर आल्यानंतर सांगितले होते. त्यानुसार तातडीची साडेअकरा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. याच वेळी ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचेही कौतुक केले होते. (Chief Minister Uddhav Thackeray lauded Vishwajeet Kadam)

अंकलखोप येथील पूरग्रस्तांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी वरील आश्वासन दिले होते. ते म्हणाले की,‘‘पूरग्रस्तांच्या व्यथा, अपेक्षा कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम सातत्याने आमच्यापर्यंत पोचवत आहेत. मदतीबाबत तुम्ही काळजी करू नये. प्रशासनाने पूरपश्चात योग्य काम करून स्वच्छता, आरोग्याची चोख व्यवस्था केली आहे. कोणतीही रोगराई पसरली जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.’’

डॉ. विश्वजीत कदम यांनी २०१९ च्या पूरकाळात पूरग्रस्ताना चांगली मदत केली होती. अशीच मदत ते आताच्या पूरग्रस्तांना करत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार सुमनताई पाटील, मोहनराव कदम, अनिल बाबर, अरूण लाड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, महेंद्र लाड, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, तहसीलदार निवास ढाणे, सरपंच अनिल विभुते, उपसरपंच स्वाती पाटील उपस्थित होते. 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन देण्‍यात आले. अंकलखोप, सूर्यगाव, नागठाणे, राडेवाडी गावांच्या वतीने एकत्रित निवेदन देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com