मुख्यमंत्री साहेब...तर माझी आई वाचली असती हो ! 

अजिंक्‍यच्या आईचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृत्यू झाला.
Chief Minister saheb ... then my mother would have survived!
Chief Minister saheb ... then my mother would have survived!

वैभववाडी  (जि. सिंधुदुर्ग) : आईचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. तिच्या प्रकृतीत सुधारणाही झाली; परंतु अचानक तिचा मृत्यू झाला. पाहिले तर तिला लावण्यात आलेल्या ऑक्‍सीजन सिलिंडरचा काटा शून्यवर होता. वेळीच तो ऑक्सिजनचा सिंलिडर बदलला असता तर आईचा जीव वाचला असता, अशा शब्दांत मुलगा अजिंक्‍य जाधव याने फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले आहे. शिवाय राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही आक्षेप नोंदविला आहे. 

अजिंक्‍यच्या आईचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्यामुळे आणि वेळेत ऑक्‍सिजन न मिळाल्यामुळे आईचा मृत्यू झाला, असा आक्षेप त्यांनी मुख्यमंत्र्यांना फेसबुकच्या माध्यमातून लिहिलेल्या पत्रात नोंदविला आहे. त्यांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले आहेत. 

पत्रात त्याने म्हटले आहे की आईला दम्याचा त्रास जाणवू लागला म्हणून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु तेथे ऑक्‍सिजनची व्यवस्था नसल्यामुळे स्वत:च्या वाहनाने तिला कणकवलीला नेले. तिथे ती ऑक्‍सिजन घेईना, म्हणून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे प्रकृती स्थिर झाली; परंतु तिला थेट कोरोना सेंटरमध्ये दाखल केले. दुसऱ्या दिवशी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे नव्हती. दहा दिवसांपूर्वी तिला ताप आला होता; परंतु त्यानंतर कोणताही त्रास झाला नाही. 

कोरोना अहवाल आल्यानंतर तिच्यावर कोविडचे उपचार सुरू झाले. प्रकृती देखील स्थिर होती; परंतु ज्या विभागात नेले तिथे 30 ते 35 रुग्णांची स्थिती गंभीर होती. ज्यावेळी तिचा मृत्यू झाला, त्यावेळी ऑक्‍सिजन सिलिंडरचा काटा शून्यावर होता. तो सिलिंडर बदलला असता तर कदाचित आईचा जीव वाचला असता, अशा शब्दांत अजिंक्‍यने आरोग्य विभागाची क्षमता, उपचार पद्धती, कोरोना सेंटरमध्ये त्याला आलेला अनुभव पत्रातून कथन केला आहे. 

याच पत्रात त्याने आपण आणि वडील दोघेही बाधित असून सायनमधील डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असून प्रकृती उत्तम असल्याचा उल्लेख केला आहे. या पत्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 

ज्या दिवशी हा रुग्ण वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आला. त्याच्या तपासणीनंतर रुग्णाची स्थिती गंभीर असल्याचे संबंधित डॉक्‍टरांच्या निर्दशनास आले. त्यांनी तातडीने कणकवलीला नेण्याचा सल्ला दिला. ज्या दिवशी रुग्ण आला, त्या दिवशी ग्रामीण रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये मुबलक ऑक्‍सिजन सिलिंडर होते. आजही कमतरता नाही. त्यामुळे ऑक्‍सिजनअभावी उपचार केले नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे. कोविड सेंटरमध्ये वेळोवेळी रुग्णांची काळजी घेतली जात आहे. 
- डॉ. नवनाथ कांबळे, ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com