चंद्रकांतदादांचा जन्म हिमालयात जाण्यासाठीच : मुख्यमंत्र्यांवरील टीकेला मुश्रीफांकडून उत्तर 

निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन.
Chandrakantdada was born to go to the Himalayas: Mushrif's reply to the criticism of the Chief Minister
Chandrakantdada was born to go to the Himalayas: Mushrif's reply to the criticism of the Chief Minister

कोल्हापूर : "उठसूठ हिमालयात जाण्याची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी झाला नसून हिमालयात जाण्यासाठीच झाला आहे,' अशी बोचरी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. 

सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल दोन दिवसांपूर्वी टीका करताना आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी झाला नसून पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी झाला आहे, अशी टिका केली होती. त्याला आज (ता. 27 नोव्हेंबर) ग्रामविकास मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. 

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील कोणत्याही एका पक्षाच्या आमदाराने राजीनामा द्यावा, त्या जागेवरून मी निवडून येऊन दाखवतो, निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन, असे आव्हान दिले होते. त्याचा संदर्भ घेत हसन मुश्रीफ यांनी आज समाज माध्यमाद्वारे टीका करताना पाटील यांचा जन्म हा राजकारणासाठी झाला नसून हिमालयात जाण्यासाठीच झाला आहे, असा पलटवार केला आहे. 

चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये कायम कलगीतुरा रंगतो. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टिकेला उत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, असा टोला लगावला होता. 

त्याच प्रमाणे कोल्हापूरमधून निवडून येऊ शकत नसल्यानेच चंद्रकांतदादांनी पुण्यातील सुरक्षित असा कोथरुड मतदारसंघ विधानसभेसाठी निवडला, अशी टीका कोल्हापुरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून होत असते. त्याला उत्तर देतानाच चंद्रकांत पाटील यांनी वरील आव्हान दिले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com