बिळातून बाहेर आलेल्या भाजप नेत्यांनी कोविड सेंटरच्या सुविधाही बघाव्यात 

त्यांनी आत जाऊन बघितलं असतं तर किती चांगली व्यवस्था निर्माण केली आहे, हे त्यांना कळाले असते.
 BJP leaders who leave home after seven months should also look at the facilities of Kovid Center
BJP leaders who leave home after seven months should also look at the facilities of Kovid Center

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते तब्बल सात महिन्यांनंतर घराच्या बिळातून बाहेर पडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक स्वागत, असा उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. 

सात महिन्यांनंतर घराच्या बिळातून बाहेर पडल्यानंतर कोविड सेंटरच्या आत न जाता बाहेर का असेना त्या कोरोनायोद्धांना निदान फुलं तरी द्यायला लागले आहेत, याबद्दल त्यांचे आभारच. दरम्यान, त्यांनी आत जाऊन बघितलं असतं तर किती चांगली व्यवस्था निर्माण केली आहे, हे त्यांना कळाले असते, असेही त्यांनी म्हटले आहे. 

येथील विनायक गणपतराव गाताडे यांच्यावर पुण्यातील दीनानथ मंगेशकर रुग्णालयात उपचार करून त्यांना बरे करून आणल्याबद्दल गाताडे परिवाराने मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार केला. विनायक यांच्यासह केडीसीसी बॅंकेचे संचालक विलासराव गाताडे, कागलचे माजी नगराध्यक्ष सुरेशराव गाताडे व या परिवारातील सदस्यांनी मुश्रीफ यांचा सत्कार केला. रांगोळ्या काढून व फुलांचा वर्षाव करीत या परिवाराने मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात हजार रुग्णांना रेमडीसिव्हर हे औषध मोफत दिले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दोन हजार इंजेक्‍शन्स मोफत दिली. जिल्ह्यासह राज्यात आणि देशात कोरोनाचा कहर कमी आला असला तरीसुद्धा मास्क, स्वच्छता व सोशल डिस्टन्सबाबत खबरदारी घेणे, अतिशय गरजेचे आहे. 

कोरोना असेपर्यंत अहोरात्र कार्यरत राहीन 

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेली सात महिने कोरोना महामारीचा संसर्ग सुरू आहे. त्यापैकी अलीकडचे चार महिने तर परिस्थिती फारच गंभीर होती. कारण दररोज शंभर- दीडशे फोन यायचे. कुणी बेड मिळवून द्या म्हणायचं, तर कुणी ऑक्‍सिजन-व्हेंटिलेटरचा बेड पाहिजे म्हणायचं, तर कुणी रेमडीसिव्हर इंजेक्‍शन मागायचं. या सगळ्या परिस्थितीत आपला-परका, गटाचा-तटाचा विचार न करता इमानेइतबारे रुग्णसेवा केली. यापुढेही गट-तट, राजकीय अभिनिवेश असले मतभेद न मानता, जोपर्यंत कोरोना असेल तोपर्यंत रुग्णांसाठी अहोरात्र कार्यरत राहीन. 

हेही वाचा : फडणवीसांनी दिलेल्या 36 कोटींचा हिशेब द्या : राष्ट्रवादीचा कुलांवर हल्लाबोल 

केडगाव (जि. पुणे) : "हम करोसो कायदा, मनमनी कारभार करत आमदार राहुल कुल यांनी भीमा-पाटस साखर कारखान्याचे वाटोळे केले आहे. याचबरोबर तालुक्‍यातील सहकारी संस्थांची त्यांनी धूळदाण उडविली आहे' असा आरोप माजी आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केला. 

दरम्यान,"माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी 36 कोटी भीमा-पाटस कारखान्याला दिले होते, त्याचा हिशेब कुल यांनी द्यावा,' असे आव्हान राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी कुल यांना दिले. 

दौंड तालुक्‍यातील भीमा-पाटस साखर कारखाना सुरू करावा आणि कामगारांची थकीत देणी देण्यात यावी, यासाठी थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज (ता. 11 ऑक्‍टोबर) पाटस येथे कारखानास्थळी आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com