रेशन वाटपात गडबड होण्याची शक्यता : सुरेश हाळवणकर 

लॉकडाउनच्या काळात कष्टकऱ्यांना अन्नधान्याची कमतरता भासू नये. यासाठी केंद्र सरकारने माफक किमतीमध्ये धान्य उपलब्ध करून दिले. या धान्य वाटपामध्ये रेशन दुकानदार गडबड करण्याची शक्यता आहे.
bjp ex mla suresh halwankar on fare price shop
bjp ex mla suresh halwankar on fare price shop

कोल्हापूर : तीन पक्षाच्या सरकारमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही. केंद्र सरकारने दिलेले धान्यरुपी मदत वितरित करताना, रेशन दुकानदार गडबड करण्याची शक्यता आहे. त्यांना सरकारचा पाठिंबा आहे, असा आरोप माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला. त्यामुळेच भाजप कार्यकर्ते रेशन दुकानासमोर लोकांच्या माहितीकरता फलक घेऊन उभारणार आहेत, असे त्यांनी सांगितले.  

केंद्र सरकारच्या 1 वर्षातील कामाचे माहिती सांगण्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते बोलत होते. कोरोना काळातील मदतीबाबत बोलताना हाळवणकर म्हणाले, 'लॉकडाउनच्या काळात कष्टकऱ्यांना अन्नधान्याची कमतरता भासू नये. यासाठी केंद्र सरकारने माफक किमतीमध्ये धान्य उपलब्ध करून दिले. या धान्य वाटपामध्ये रेशन दुकानदार गडबड करण्याची शक्यता आहे. त्यांना सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळेच पत्रकारांनी यावर लक्ष ठेवावे. लोकांना नेमकी किती धान्य किती किमतीला दिले जाते याची माहिती होण्यासाठी, भाजप कार्यकर्ते रेशन दुकान समोर फलक घेऊन उभे राहतील. राज्य सरकारने ऑनलाईन तक्रारी ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा उपयोग करावा व आपली तक्रार नोंदवावी, असे त्यांनी म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे, जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिकोडे, माजी आमदार अमोल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप किसान आघाडी प्रमुख भगवान काटे, सरचिटणीस हेमंत आराध्ये हे उपस्थित होते.

परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिघांना विठ्ठल दर्शनाचा पास कसा काय दिला?

पुणे: लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मोठ्या शहरांत पोलिस आयुक्त आणि ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रवासी पास देण्यात येत आहेत. राज्यात अजूनही जिल्हाबंदी सूरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामांसाठीच प्रवासी पास देणे आवश्यक आहे, मात्र परभणी जिल्हाधिकाऱ्यांनीच हा नियम मोडित काढला आहे.

परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिघांना थेट विठ्ठल मंदिरापर्यंत पास दिला आहे. त्यामुळे पुणे विभागाचे प्रशासन दक्ष झाले आहे. एपिडेमिक एक्टनुसार जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार असतात. त्यामुळे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अशा परवानग्या दिल्यातर मोठा गोंधळ उडू शकतो. मुळात शासनाने यंदा वारी बंद ठेवली आहे. तसेच आषाढी एकादशीपर्यंत मंदिर बंद ठेवले आहे. अशा परिस्थितीत प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय वादात अडकला आहे. त्यामुळे पुणेविभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पंढरपूरसाठी पास देवू नयेत, अशी सूचना करणारे पत्र राज्यातील सर्व विभागीय आय़ुक्तांना पाठवले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com