भाजप प्रदेश उपाध्यक्षपदावरून धनंजय महाडिकांना वगळले

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रवेशानंतर त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती.
bjp dropped dhanajay mahadik as state vice president post
bjp dropped dhanajay mahadik as state vice president post

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नव्या कार्यकारिणीची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. यात विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची निवड करण्यात आली. श्री. महाडिक यांना प्रदेश कार्यसमितीचे निमंत्रित सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, नव्या कार्यकारिणीत श्री. हाळवणकर यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, 'गोकुळ' चे संचालक बाबा देसाई, सम्राट महाडिक यांची वर्णी लावण्यात आली आहे. श्री. जाधव व श्री. महाडिक यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी तर श्री. शेळके व श्री. देसाई यांची प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे श्री. पाटील फेब्रुवारी महिन्यात स्विकारली. त्यानंतर आज त्यांनी ही नवी कार्यकारिणी जाहीर केली. यात 12 प्रदेश उपाध्यक्ष, सहा प्रदेश सरचिटणीस व 12 चिटणीस यांचा समावेश आहे. नव्या पदाधिकाऱ्यांत तरूणांना संधी देण्याबरोबरच 33 टक्के महिलांनाही संधी देण्यात आली आहे. याशिवाय 68 जणांची कार्यकारिणी सदस्य, 139 जण निमंत्रित तर 58 जण हे विशेष निमंत्रितांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. महाडिक हे 2014 ते 2019 या काळात राष्ट्रवादीचे खासदार होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रवेशानंतर त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. गेली वर्षभर ते या पदावर कार्यरत होते, पण नव्या कार्यकारिणीत त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदावरून वगळून त्यांची नियुक्ती प्रदेश कार्यसमितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील व्यापार प्रकोष्ठच्या सहसंयोजकपदी विनोद कांकाणी यांना संधी देण्यात आली आहे.


जळगाव महापालिकेत सत्ताधारी भाजप नगरसेवकांत मतभेद

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांत आज उघड मतभेद दिसून आले. सफाई मक्‍त्त्याच्या निविदावरून हा वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या नगरसेवकांच्या एका गटाने स्थायी समितीच्या सभापतीकडे नवीन दिलेल्या मक्‍त्याबाबत शंका उपस्थित केली. त्या संदर्भात आयुक्तांनी आज स्थायी समिती सभापती, महापौर, भाजप नगरसेवक व तक्रारदार नगरसेवक यांची बैठक आयोजित केली होती. मात्र तक्रारदार नगरसेवकांनी आम्ही लेखी तक्रार दिली त्यावर खुलासा करा असे सांगून बैठकिला उपस्थित राहण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com