चंद्रकांत पाटलांना धक्का : भुदरगड पंचायत समितीच्या भाजपच्या एकमेव सदस्या शिवसेनेत

अक्काताई नलवडे ह्या २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत मिणचे गणातून विजयी झाल्या होत्या.
Bhudargad Panchayat Samiti BJP member Akkatai Nalawade joins Shiv Sena
Bhudargad Panchayat Samiti BJP member Akkatai Nalawade joins Shiv Sena

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांचा गृहतालुका असलेल्या भुदरगडमध्येच धक्का बसला आहे. भुदरगड तालुक्यातील पक्षाच्या एकमेव पंचायत समिती सदस्या आक्काताई प्रवीण नलावडे यांनी आज (ता. ७ जून) आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख, खासदार प्रा. संजय मंडलिक व शिवसेनेचे  कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना शिवबंधन बांधण्यात आले. (Bhudargad Panchayat Samiti BJP member Akkatai Nalawade joins Shiv Sena)

दरम्यान,  नलवडे ह्या २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत मिणचे गणातून विजयी झाल्या होत्या. अक्काताई नलवडे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना धक्का समजला जात आहे. एकीकडे पक्षाची राज्याची जबाबदारी असताना चंद्रकांतदादा यांना त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी सोडून जात आहेत. त्यातच जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाच्या असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही भाजपचा पाठिंबा असलेल्या महाडिक-पाटील गटाला अपयश आले आहे.  

या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे नूतन संचालक नंदकुमार डेंगे, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक दत्ताजी उगले, बाजार समिती संचालक कल्याणराव निकम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी सभापती बाबा नांदेकर, माजी उपसभापती मदनदादा देसाई, प्रभारी सभापती सुनिल निंबाळकर, संदीप वरंडेकर, विजय बलुगडे, माजी सभापती किर्तीताई देसाई, भुदरगड तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, प्रवीण नलवडे, राधानगरी तालुकाप्रमुख भिकाजी हळदकर, अरविंद पाटील, संभाजी भोकरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य व प्रमुख नेते मंडळी उपस्थित होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com