अविनाश मोहिते खोटी माहिती देत सभासदांची दिशाभूल करत आहेत 

सहकार कायद्यातील 97 वी घटना दुरूस्ती ही अविनाश मोहिते हे अध्यक्ष असल्याच्या काळातच झालेली आहे. घटना दुरूस्तीतील ही अट जाचक होती, तर ती त्यांनी सत्तेवर असताना का स्वीकारली? त्याला विरोध का केला नाही? आमच्या संचालक मंडळाला सहकार कायद्यातील या घटना दुरूस्तीच्या नियमांचा फक्त अवलंब करून सदर नोटीसा पाठवाव्या लागल्या आहेत.
Avinash Mohite is misleading the members by giving false information
Avinash Mohite is misleading the members by giving false information

पुणे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अक्रियाशील सभासदावरून सातारा जिल्ह्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या आहेत. माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी 'मधल्या काळात सत्ताधारी गटाने जाणीवपूर्वक सभासदांना नोटिसा पाठवून अक्रियाशील यादीत समाविष्ट करत मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे,' असा आरोप केला आहे. 

त्याला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, "य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान संचालक मंडळ शेतकरी सभासद हितासाठी सहकार कायद्यातील मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करत कार्यरत आहे. कारखान्याच्या वाटचालीत महत्वपूर्ण सहभाग नोंदविणाऱ्या कुठल्याही सभासदाचे सभासदत्व रद्द होऊ नये, ही विद्यमान संचालक मंडळाची प्रामाणिक इच्छा आहे. 

सहकार कायद्यातील 97 व्या घटना दुरूस्तीनुसार जी व्यक्ती कारखान्याकडे पाच वर्षांत एकदाही ऊस घालत नाही अथवा पाच वर्षांत एकाही सर्वसाधारण सभेस उपस्थित राहत नाही, अशा व्यक्तींना अक्रियाशील सभासद करण्याबाबत नोटीस पाठविण्याची अट सर्वच सहकारी संस्थांना बंधनकारक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सहकार कायद्यातील 97 वी घटना दुरूस्ती ही अविनाश मोहिते हे अध्यक्ष असल्याच्या काळातच झालेली आहे. घटना दुरूस्तीतील ही अट जाचक होती, तर ती त्यांनी सत्तेवर असताना का स्वीकारली? त्याला विरोध का केला नाही? आमच्या संचालक मंडळाला सहकार कायद्यातील या घटना दुरूस्तीच्या नियमांचा फक्त अवलंब करून सदर नोटीसा पाठवाव्या लागल्या आहेत, असे जाधव यांनी नोटिशीत म्हटले आहे. 

त्यांनी म्हटले आहे की, मुख्य म्हणजे 6368 हा जो काही आकडा माजी अध्यक्ष सांगत आहेत, तो मुळात चुकीचा आहे. सहकार कायद्यातील 97 व्या घटना दुरूस्तीनुसार कारखान्याच्या वतीने 2019-20 या आर्थिक वर्षात 3720 सभासदांना याबाबतच्या नोटीसा पाठविण्यात आल्या. यातील 1072 पैकी मृत वगळता अन्य सभासदांनी नोटिशीला उत्तर देत कारखान्याकडे ऊस घातला आहे अथवा सभेला उपस्थिती दर्शविलेली आहे.

मात्र, ज्यांनी या नोटिशीला उत्तर दिलेले नाही, अशा उर्वरित 2648 सभासदांना चालू वर्षी पुन्हा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. पण माजी अध्यक्ष यांनी मात्र पूर्वीचे 3720 आणि यातीलच उर्वरित 2648 अशांची एकत्र बेरीज करून 6368 सभासदांचा मताधिकार धोक्‍यात आल्याची खोटी माहिती देत, सभासदांची दिशाभूल करत आहे. 

विद्यमान संचालक मंडळाची नाहक बदनामी करण्यासाठी त्यांनी आपल्या प्रेस नोटमध्ये अनेक खोट्यानाट्या गोष्टींचा तपशील दिलेला आहे. मुळात अक्रियाशील सभासदांना नोटीसा पाठविताना कायद्यातील तरतुदींचे योग्य पालन कारखान्याने केले आहे. यामध्ये कोणताही पक्षपात केलेला नाही अथवा जाणीवपूर्वक कोणावरही अन्याय झालेला नाही. ज्यांनी नोटिशीला उत्तर देत रितसर कार्यवाही केलेली आहे, अशांना पुन्हा क्रियाशील सभासदत्व बहाल करण्यात आले आहे,' असे जाधव यांनी नोटिशीत नमूद केले आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com