फुलांच्या सजावटीमुळे विठ्ठलाचं रूप अधिकच खुललं..(व्हिडिओ पहा) - Attractive floral decoration at the Vitthal Rukmini Temple in Pandharpur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

फुलांच्या सजावटीमुळे विठ्ठलाचं रूप अधिकच खुललं..(व्हिडिओ पहा)

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

पंढरपूर : चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष. याच निमित्ताने  पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.पुणे येथील भाविक नवनाथ मोरे व नानासाहेब मोरे यांनी ही सजावट केली आहे.

देवाच्या गाभाऱ्यासह सोळखांबी, सभामंडप, प्रवेश द्वार आणि संत नामदेव पायरी जवळ फुलांची  सजावट केली आहे. झेंडू, गुलाब, आष्टर, शेवंती, कामिनी ,ब्लूडीजी अशा पाच टन  विविध रंगसंगती फुलांनी मंदिर सजवले आहे.

आज नवीन वर्षाच्या निमित्ताने विठ्ठलाला निळया  रंगाचा अंगरखा व केशरी रंगाचे  धोतर, गळ्यात तुळशीची हार असा पोषाख परिधान करण्यात आला आहे. तर रुक्मिणी मातेलाही निळया रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे. फुलांच्या सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

दरम्यान लॅाकडाउनमुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. यापूर्वी मुखदर्शन सुरू होते. पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने देवाचे मुख दर्शन ही आता बंद आहे. त्यामुळे नविन वर्षातील देवाच्या दर्शनाचा लाभ चुकण्याची खंत भाविकामध्ये आहे.

हेही वाचा : संभाजीराजेंच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आज गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे भूमिपूजन... 

कोल्हापूर : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली शहर गॅस वितरण योजना कोल्हापूरला मंजूर होऊन अनेक वर्षे झाली होती. महापालिकेच्या परवानग्या आता मिळाल्या असून प्रकल्पाचा औपचारिक कार्यारंभ आज गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर  होणार आहे. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून मोजक्याच म्हणजे पाच ते सहा  नेतेमंडळींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि बाकी नेतेमंडळीच्या ऑनलाईन उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. आज (ता.13) दुपारी तीन वाजता राजगंगा अपार्टमेंट, दत्त मंदिर समोर, शिवराज कॉलोनी, कदमवाडी, कोल्हापूर येथे होणार आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख