कॉंग्रेसच्या आणखी एका नेत्याच्या मुलास चंद्रकांत पाटलांनी भाजपत आणले

सी. बी. आप्पा आमचेच आहेत.
another Congress leader's  son of  joined the BJP
another Congress leader's son of joined the BJP

कामेरी (सांगली)  ः कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील आप्पा यांचे सुपुत्र माजी सरपंच जयराज पाटील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जयराज पाटील भाजपत आले आहेत, त्यामुळे सी. बी. आप्पाही लवकरच येतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
 
पुणे पदवीधर मततदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील कामेरी येथे सी. बी. पाटील यांच्या घरी आले होते. या वेळी भाजपचे युवा नेते सम्राट महाडिक उपस्थित होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील यांच्या राजकीय निर्णयाबाबत प्रदेशाध्यक्ष पाटील यांना विचारले असता त्यांनी "सी. बी. आप्पा आमचेच आहेत. ते लवकरच पक्षात येतील' अशी प्रतिक्रीया दिली. 

तिथे उपस्थित युवा नेते जयराज पाटील यांच्या हाती चंद्रकांत पाटील यांनी पुष्पगुच्छ दिला आणि "जयराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला' असे जाहीर केले. जयराज यांनी ही हसत याबाबत "आपण सकारात्मक आहे' असे दाखवून दिले. 

वाळवा तालुक्‍यातील भाजपच्या गटबाजी संदर्भात पाटील म्हणाले, ‘सर्वांना बरोबर घेऊनच आमची वाटचाल असेल. तालुक्‍याची कार्यकारिणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निश्‍चित करु. जयराज पाटील यांना भाजप युवा मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीत संधी देऊ.’

ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, कॉंग्रेसच्या जयश्री पाटील, माजी उपसरपंच दिलीप जाधव, धनाजी पाटील, शशिकांत पाटील, महादेव रास्कर, जयदीप पाटील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com