चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरात आणखी एक धक्का 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील यांच्या फार्महाउसवर कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजप सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
palrao Patil .jpg
palrao Patil .jpg

चंदगड (कोल्हापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील यांच्या फार्महाउसवर कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजप सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोणत्या पक्षात जावे, यासाठी ११ कार्यकर्त्यांची समिती केली असून, ती निर्णय देणार आहे; परंतु, चर्चेचा एकूण रोख पाहता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्‍यता आहे.

तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची इच्छा बाजूला ठेवून भाजपपुरस्कृत उमेदवार शिवाजी पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती, परंतु भाजपकडून सन्मान नसल्याचे सातत्याने जाणवू लागले. अन्य नेत्यांचे महत्त्व वाढू लागले. बलाढ्य गट असलेल्या पाटील यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने त्यांच्या गोटात अस्वस्थता होती. त्याचा काल स्फोट झाला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपाळराव पाटील यांना भाजप प्रवेशावेळी आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे शब्द दिले होते ते पाळले नसल्याचा आरोप केला. प्रामाणिक काम करूनही अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर पक्षात राहायचे नाही असा निर्णय झाला. 

दरम्यान, बैठकीवेळी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्‍टर विलास पाटील, माजी सभापती जगन्नाथ हुलजी यांनी गटात प्रवेश केला. विलास पाटील यांच्या पत्नी विद्या या जिल्हा परिषद सदस्य असून त्याही गोपाळरावांच्या नेतृत्वाने काम करणार असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

कोण होणार गाव कारभारी? सदस्यांचा जीव टांगणीला

पिंपरी : पुणे जिल्ह्यातील चौदाशे गावांचे कारभारी कोण हे उद्या (ता.२९) ठरणार आहे. कारण या गावांतील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. दरम्यान,नुकतीच (ता.१५) निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींसह ती होणाऱ्या गावांतील सरपंचपदाचीही सोडत उद्याच काढली जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली तेथील तहसीलदार सोडत काढणार आहेत. १३ तालुक्यांसाठी असे १३ उपजिल्हाधिकारी नेमण्यात आले आहेत. मावळ तालुक्यात संदेश शिर्के यांची नेमणूक झाली आहे. तेथील सोडत साडेअकरा वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये काढली जाणार आहे.

मावळ तालुक्यातील ५७ ग्रामंपंचायतींची १५ डिसेंबरला निवडणूक झाली. मात्र, त्यासह भविष्यात निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींसह तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १०३ ग्रामपंचायतींसाठी उद्याच सोडत काढली जाणार असल्याचे मावळचे तहसीलदार मधूसुदन बर्गे आणि नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com