जनावरांचे बाजार न भरल्याने कोल्हापुरात 10 कोटींची उलाढाल ठप्प

कोल्हापूरात कोपार्डे (ता.करवीर), शाहू मार्केट यार्ड, कागल आदी भागात जनावरांचा आठवडी बाजार भरतात.
animal market stopped due to corona virus
animal market stopped due to corona virus

कोल्हापूर: कोरोना संसर्गामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे गेली तीन महिने दुभत्या जनावरांचा बाजार भरलाच नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जवळपास 10 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. व्यक्तीगत स्तरावर काही जनावरे खरेदी विक्री एजंटानी जनावरे विकण्याचा प्रयत्न केला मात्र वाहतूक होऊ शकलेली नाही.

कोल्हापूरात कोपार्डे (ता.करवीर), शाहू मार्केट यार्ड, कागल आदी भागात जनावरांचा आठवडी बाजार भरतात. गेल्या दोन महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे या आठवड्याभरात जनावरांचे बाजार भरू शकले नाहीत. परिणामी जनावरांचा खरेदी विक्री थंडावली आहे. या व्यवसायात दरवर्षी उन्हाळाजवळ आला की, मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असतो. त्यामुळे वैरण व पाण्याचा प्रश्‍न असलेल्यांना सांगली, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, नळदुर्ग, लातूर, बीड, नांदेड भागातील अनेक शेतकरी जनावरांची विक्री करतात. याभागातील जनावरे कमी किंमतीत खरेदी करून कोल्हापूर, सांगली भागात आणली जातात. त्यांना दोन तिन महिने चांगला चारा पाणी देऊन जनावरांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांची चढ्या भावात विक्री केली जाते. दरवर्षी होणारा व्यवहार यंदा थांबला आहे. सुमारे 10 कोटींची उलाढाल थांबली आहे.

स्थानीकस्तरावर लॉकडॉऊनमुळे बहुतेक शेतकरी घरी होते. त्यामुळे चारा वैरण आणण्यास वेळ आहे. जनावरांची काळजी घेण्यासाठी पूरेसा वेळ आहे. गेल्या दोन महिन्यात फारशी जनावरे विक्रीसाठी कोण नेली नाहीत. हा व्यवसायाचे थांबल्याने जिल्ह्यातील परजिल्ह्यातील विविध बाजारात जाऊन खरेदी विक्रीकरणारा एजंट वर्ग सद्या गावात गावात थांबून आहे. त्यामुळे उलाढाल थांबली आहे.

याबाबत पशू वैद्यक डॉ. किरण उवणने यांना विचारले असता ते म्हणाले की, जनावरांची खरेदी विक्री उलाढाल थंडावल्याचे जाणवत आहे मात्र उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत आहे. अशात जनावरांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे. घटसर्फ तसेच बुळकांडी अन्य आजार प्रतिबंधक लसीकरण शासकीय पशू चिकित्सालयात होत आहे. असे लसीकरणकरून घेतल्यास जनावरांची प्रकृती धडधाकट रहाण्यास मदत होऊ शकते. भविष्यात अशी जनावरे विकताना त्यांची किंमत चांगली येऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊन व सद्याचा पावसाळाही जनावर मालकांनी आपली जनावरे सक्षम ठेवण्यासाठी आलेले संधी आहे, असे समजणे महत्वाचे आहे.

दरवर्षी प्रमाणे सरासरी भाव असे:
म्हैशींचे भाव 30 ते 60 हजारापर्यंत बैलांचे भाव 40 ते 60 हजारांपर्यंत आहेत. देशी गायी 20 ते 40 हजारापर्यंत भाव आहेत. शेळी 300 ते 2000 रूपयांपर्यंत भाव आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com