आमदार संजय शिंदे यांचे प्रकरण चौकशीला का येत नाही?

मोहिते-पाटील गटानेघटना मागवली होती.
Why MLA Sanjay Shinde's case is not being investigated
Why MLA Sanjay Shinde's case is not being investigated

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्‍यातील मोहिते पाटील समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहा सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व पक्षाने रद्द केल्याप्रकरणी मंगळवारी (ता. 10 ऑगस्ट) झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने घटना सादर केली. ता. 6 जुलै रोजीच्या सुनावणीत मोहिते-पाटील गटाच्या वकिलांनी घटनेची मागणी केली होती. आता पुढील सुनावणी 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. (Why MLA Sanjay Shinde's case is not being investigated) 

यापूर्वी ता. 3 ऑगस्ट रोजीच्या सुनवणीत मागील सुनावणीच्या वेळी सादर केलेल्या तीन अर्जांवर चर्चा झाली होती. मोहिते-पाटील गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पक्षाची घटना मागवली होती. ती आजच्या सुनवणीच्या वेळी सादर करण्यात आली. शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या सहा सदस्यांनी विरोधात मतदान केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. 

आजच्या सुनावणीला तक्रारदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांचे वकील ऍड. उमेश मराठे, ऍड. इंद्रजित पाटील, ऍड. बाबासहेब जाधव हे हजर होते. मोहिते- पाटील गटाचे अरुण तोडकर, गणेश पाटील, सुनंदा फुले ऍड. दत्तात्रय घोडके, ऍड. नितीन खराडे हे हजर होते. यापूर्वीच्या तीनही अर्जांवर सुनावणी झाली. मात्र, निकाल झाला नाही. या तीनही अर्जावर सुनावणी होऊन या प्रकरणाचा अंतिम फैसला काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा  ः एकनाथजी, प्रतापला कुठेही कट मारू नका : उद्धव ठाकरे
 
करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी असताना लोकसभा निवणूक लढवली होती. त्यांचे जिल्हा परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी तक्रार अरुण तोडकर यांनी केली होती. 2019 पासून हे प्रकरण दाखल आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी एकदाही सुनावणी झाली नाही किंवा या अर्जाची प्राथमिक चौकशीही झाली नाही, याबद्दल अरुण तोडकर यांचे वकील ऍड. दत्तात्रय घोडके यांनी हे प्रकरण चौकशीला का येत नाही अशी विचारणा करत नाराजी व्यक्त केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com