तासगाव कारखान्याच्या लढ्यात एन. डी. पाटील उतरणार  - veteran leader n d patil will address public meeting in tasgaon | Politics Marathi News - Sarkarnama

तासगाव कारखान्याच्या लढ्यात एन. डी. पाटील उतरणार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

"कारखाना सुरू झाल्यावर धुराडीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे परिसरातील द्राक्ष बागेचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे राखेसाठी काय प्रयोजन केले आहे याची उत्तरे संजय पाटील यांनी द्यावीत," असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुणे : तासगाव साखर कारखानाप्रश्नी जेष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महेश खराडे यांनी भेट घेतली. तेव्हा "सभासद, कामगार यांच्या अस्तित्वासाठी नेटाने लढा द्या. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आपण सभासदांचा मेळावा घ्या.त्या मेळाव्याला मी उपस्थित राहीन," असे पाटील यांनी खराडे यांना सांगितले. 

महेश खराडे, संजय बेले, भागवत जाधव, प्रकाश देसाई, संतोष शेळके यांनी तासगाव कारखानाप्रश्नी एन. डी. पाटील यांची भेट घेतली. काही वर्षापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली तासगाव कारखान्याचे आंदोलन झाले होते. त्या आंदोलनामुळे विक्री प्रक्रिया लांबणीवर पडली होती. पण आता एन डी पाटील हे ९२ वर्षाचे आहेत. त्यामुळे आंदोलन थंडावले आहे. तासगाव कारखाना विक्री प्रक्रिया पार पडली असून तो कारखाना खासदार संजय पाटील यांच्या गणपती ऍग्रो प्रा लि. या कंपनी ने ३४ कोटीला विकत घेतला आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे."असे महेश खराडे म्हणाले.

''२७ हजार सभासद, दीड हजार कामगार आणि कारखान्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ?"असा  प्रश्न खराडे यांनी उपस्थित केला आहे.

"तासगाव कारखाना बचाव लढ्याची सुरुवात एन. डी. पाटील यांनी केली होती. म्हणून त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो.त्यावेळी त्यांनी या लढ्याला पाठींबा आहे. तुम्ही नेटाने लढा द्या. कोरोना संपल्यानंतर सभासदांचा एक मेळावा घ्या.त्याला मी उपस्थित राहीन असे ते म्हणाले," अशी माहिती खराडे यांनी दिली आहे. या प्रश्नी लवकरच येळावी येथे मेळावा घेणार आहोत. या मेळाव्यासाठी सर्व पक्ष सर्व सामाजिक संघटना, कामगार, सभासद, जमिनी देणारे शेतकरी आणि परिसरातील द्राक्ष बागायतदार यांना निमंत्रित करणार असल्याचे खराडे म्हणाले.

धनगर समाजाचा आत्मचिंतन दिवस

सांगली: गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांनी धनगर समाजाला वेळोवेळी एसटी आरक्षणाचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात मात्र नियोजनबद्ध फसवणूक केली. त्यांच्याशिवाय इतर नेत्यांनीही आजवर समाजाची फसवणूक केली आहे. फसवणूक करणारे सर्वजण नामानिराळे झाले आहेत, मात्र धनगर समाज हा प्रश्न विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही. हा निर्धार समाजाने केला असल्याची माहिती धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली.

सहा वर्षापुर्वी ( 2014 साली) देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला येवून धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते. तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आपल्या प्रचारसभांत घेतला होता. त्यामुळे भाजपच्या नेत्यांवर धनगर समाजाने विश्वास ठेवला, मात्र प्रत्यक्षात समाजाचा विश्वासघात झाला. नियोजनबद्धरित्या फसवणूक करण्यात आली. म्हणून फडणवीस यांनी बारामतीत आश्वासन दिलेला 29 जुलै हा दिवस 'आत्मचिंतन दिवस' म्हणून पाळण्याचे आवाहन धनगर विवेक जाग्रती अभियानाच्यावतीने करण्यात आले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख