वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन  - Vasudev Narayan Utpat dies of corona | Politics Marathi News - Sarkarnama

वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

वा. ना. उत्पात यांना सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होती.

पंढरपूर : पंढरपूर येथील माजी नगराध्यक्ष, सावरकरप्रेमी, भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात यांचे आज (ता. 28 सप्टेंबर) दुपारी कोरोनामुळे पुणे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. वा. ना. हे पंढरपूरमधील राजकारण, समाजकारण आणि अध्यात्मिक क्षेत्रातील प्रमुख नाव होते. 

वा. ना. उत्पात यांना सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होती. उपचारासाठी त्यांना पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले. 

वा. ना. उत्पात हे अध्यात्माचे गाढे अभ्यासक होते. पंढरपूरचे नगराध्यक्ष व विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावकर यांचे ते निस्सीम भक्त होते. येथील सावरकर वाचनालयाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. 

समस्त उत्पात समाजाचे चेअरमन म्हणून ते अनेक वर्षांपासून कार्यरत होते. सावरकर भक्त म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती. 
अनेक वादग्रस्त व्यक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असत. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख