आम्हाला चोर म्हणणाऱ्या सोनवणेंच्या त्रासाला कंटाळून ठेकेदार पळून गेला - Tired of the harassment of former MLA Sharad Sonawane, the contractor fled : Amol Kolhe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

आम्हाला चोर म्हणणाऱ्या सोनवणेंच्या त्रासाला कंटाळून ठेकेदार पळून गेला

रवींद्र पाटे
शनिवार, 17 जुलै 2021

त्यानंतर बाह्यवळण रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला.

नारायणगाव (जि. पुणे) : आम्हाला चोर म्हणणाऱ्या जुन्नरच्या माजी आमदार शरद सोनवणे यांच्या त्रासाला कंटाळून पुणे-नाशिक महामार्गावरील बाह्यवळणाचे काम करणारा ठेकेदार पळून गेला. त्यांनी ठेकेदाराकडून बीएमडब्ल्यू गाडी घेतल्याची चर्चा आहे. त्यानंतर बाह्यवळण रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. पण, पद गेल्यानंतर शिरूरचे माजी खासदार व जुन्नरचे माजी आमदार वैफल्यग्रस्त व अस्वस्थ झाले आहेत, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव आणि शरद सोनवणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. (Tired of the harassment of former MLA Sharad Sonawane, the contractor fled : Amol Kolhe)

नारायणगाव व खेड बाह्यवळण रस्त्याचे उदघाटन शनिवारी (ता. १७ जुलै) करण्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी जाहीर केले होते. मात्र, त्या पूर्वीच शुक्रवारी (ता. १६ जुलै) सायंकाळी बाह्यवळण रस्त्याचे उदघाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले होते. त्या वेळी माजी खासदार आढळराव पाटील व माजी आमदार शरद सोनवणे यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्याला कोल्हे यांनी आज प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा : वयस्कर माणसाने पोरकटपणा करून हसू करून घेऊ नये : कोल्हेंची आढळरावांवर बोचरी टीका

आढळराव यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार कोल्हे म्हणाले की, माजी खासदारांविषयी मला आदर आहे. नारायणगाव व खेड बाह्यवळण उदघाटन कार्यक्रमाचे मी त्यांना निमंत्रण देणार होतो. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच बाह्यवळण रस्त्याचे उदघाटन करून या कार्यक्रमाला राजकीय रंग दिला. लोकप्रतिनिधी हा राजा नसून जनतेचा सेवक आहे. माजी खासदार आढळराव पाटील पंधरा वर्षे या भागाचे लोकप्रतिनिधी होते. या कालावधीत त्यांना महामार्गाचे व सात बाह्यवळण रस्त्यांचे काम व चाकण उड्डाण पुलाचे काम पूर्ण करता आले नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी बोलताना केला. 

दरम्यान, पूर्व नियोजनानुसार आज (ता. १७ जुलै) खासदार डॉ. कोल्हे यांच्या उपस्थितीत बाह्यवळण रस्त्याचे उदघाटन प्रकल्पग्रस्त शेतकरी बाळासाहेब पाटे यांच्या हस्ते पुन्हा करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके होते. या वेळी सभापती  संजय काळे, अनिल मेहेर, रमेश भुजबळ, गणपतराव फुलवडे, पांडुरंग पवार, धोंडिभाऊ पिंगट, आशा बुचके, राजश्री बोरकर, शरद लेंडे, भाऊ देवाडे, मोहित ढमाले, तहसीलदार हनुमंत कोळेकर, दिलीपराव मेदगे,  दिलीप कोल्हे, राजेश गावडे, अशोक घोडके, अनंतराव चौगुले, गणेश वाजगे, राजेंद्र मेहेर, तानाजी डेरे, संतोष खैरे, विकास दरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख