ठाकरे सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना हेक्‍टरी 50 हजार रुपये भरपाई द्यावी 

भाजप आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी (ता. 18 सप्टेंबर) थेट शेतकऱ्यांच्या शेतात जावून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
The Thackeray government should pay Rs 50,000 per hectare to those affected by heavy rains
The Thackeray government should pay Rs 50,000 per hectare to those affected by heavy rains

पंढरपूर : मागील दोन-तीन दिवसांपासून माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्‍यातील दुष्काळी भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. बुधवारी (ता. 16 सप्टेंबर) पिलीव, कुसमोड, शिंगोर्णी या भागात अतिवृष्टी झाली. यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

भाजप आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी (ता. 18 सप्टेंबर) थेट शेतकऱ्यांच्या शेतात जावून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतात काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी ठाकरे सरकारने हेक्‍टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणीही आमदार राम सातपुते यांनी या वेळी केली. 

कायम दुष्काळी भाग असलेल्या पिलीव व परिसरात बुधवारी अतिवृष्टी झाली. यामध्ये जवळपास दोनशेहून अधिक हेक्‍टर क्षेत्रावरील, मका, बाजरी,केळी, ऊस, डाळिंब, द्राक्ष आदी पिकांसह फळ बागांचे नुकसान झाले आहे. आधीच लॉकडाऊन आणि दुष्काळामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. हातातोंडाशी आलेले बाजरी, मक्‍याचे पीक वाहून गेले आहे. मुसळधार पावसामुळे या भागात अनेक घरांची पडझड झाली आहे. अशातच पिलीव येथील बाळासाहेब खरे या औषध दुकानदाराचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्य झाला आहे. मुसळधार पावसामुळे या भागात हाहाकार उडाला आहे. 

आमदार राम सातपुते यांनी आज नुकसान झालेल्या पिकांची पाहाणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिलीव येथील काही महिला शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. 

शिंगोर्णी येथील ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या बाळासाहेब खरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी आमदार सातपुते यांनी कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

पाहणीनंतर त्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून पंचनाम्याचा अहवाल तातडीने सरकारकडे पाठवून द्यावा, अशा सूचनाही आमदार सातपुते यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. 


हेही वाचा : चाकणमध्ये शिवसेनेने अवघ्या दोन महिन्यांसाठी निवडला नवा नगराध्यक्ष 


चाकण (जि. पुणे) : खेड तालुक्‍यातील चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहा नितीन जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रिक्त नगराध्यक्षपदासाठी जगताप यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. 

दरम्यान, नगरपरिषदेचा पंचवार्षिक कालावधी संपत आला आहे, त्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षा जगताप यांना फक्त दोन महिने या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून तीन जणांनी काम केले आहे. 

याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेडचे प्रांताधिकारी संजय तेली, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली. नगराध्यक्ष शेखर घोगरे यांनी दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. 

निवडणूक होण्याअगोदर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष हृषिकेश झगडे जबाबदारी सांभाळत होते. शिवसेनेच्या स्नेहा जगताप या नगराध्यक्षा झाल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे शिवसेनेकडे आली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com