मंदिरे जनतेसाठी बंद ; नेत्यांसाठी खुली का ? - Temples closed to the public; Is it open to leaders? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

मंदिरे जनतेसाठी बंद ; नेत्यांसाठी खुली का ?

मुझफ्फर खान
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

मंदिर बंदी केवळ सामान्य जनतेसाठी का ? असा प्रश्‍न जनतेमधून विचारला जाता आहे

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामान्य जनतेसाठी राज्यातील मंदिरामध्ये सरकारने प्रवेशबंदी केली आहे. असे असताना चिपळूण तालुक्यातील मंदिरांमध्ये लोकप्रतिनिधींना खुलेआम प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे मंदिर बंदी केवळ सामान्य लोकांसाठीच का ? असा प्रश्‍न जनतेमधून विचारला जाता आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील मंदिरे मार्च 2020 मध्ये बंद करण्यात आली. कोरोनाची लाट हळूहळू ओसरत असताना लॉकडाउनही शिथील केले जात आहे. मात्र राज्यातील देवस्थानाचे प्रवेशद्वार अजूनही उघडलेले नाही. मंदिरांवर अवलंबून असलेले उद्योगधंदे आणि तरूण बेरोजगार आहेत. त्यामुळे मंदिरे खुली करा अशी मागणी भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे.

विविध ठिकाणी घंटानांद आंदोलनही करण्यात आले. त्याची फारशी दखल सरकारने घेतली नाही. मात्र सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींना खुलेआम मंदिर प्रवेश दिला जात आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत नुकतेच तिवरे गावच्या दौर्‍यावर होते. तेथील दोन मंदिरांचे त्यांनी भूमीपूजन केले. नंतर तिवरेतील स्थानिक मंदिरात जावून त्यांनी देवीचे दर्शन घेवून आर्शिवादही घेतले.

 यावेळी त्यांच्याबरोबर आजी-माजी आमदारांसह रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, चिपळूण पंचायत समितीचे सभापती व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.विशेष म्हणजे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात 144 कलम लागू असताना खासदारांच्या दौर्‍यात मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी करण्यात आली.

तालुक्यातील लोकप्रतिनिधीही नवरात्रोत्सवादरम्यान विविध मंदिरांना भेटी देवून देवींचे दर्शन घेत आहेत. ही मंदिरे सामान्य लोकांसाठी बंद असताना केवळ नेत्यांसाठी खुली कशी काय झाली असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख