थॅंक्यू, अशोकबापू आणि सुजाताभाभी! :पूरग्रस्तांना मदत केल्याबद्दल सुळेंकडून कौतुक

याच उपक्रमासाठी शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील चौकात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून दाद दिली.
Supriya Sule appreciated the work of MLA Ashok Pawar and Sujata Pawar
Supriya Sule appreciated the work of MLA Ashok Pawar and Sujata Pawar

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पूरग्रस्त कोकणवासियांसाठी आपल्या मतदार संघातील सर्व गावांतून पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन करीत मदत संकलीत केली. केवळ दहाच दिवसांत १० हजार किराणा किटचे हे सर्व साहित्य तब्बल २९ ट्रक एवढे झाले. ह्यासाठी पुढाकार घेणारे आमदार अशोक पवार आणि त्यांच्या पत्नी माजी सभापती सुजाता पवार यांनी ही मदत रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पोचवली. या प्रवासादरम्यान सुप्रिया सुळे यांनी पवार दांपत्यांसह राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे व्हिडिओ कॉल करुन कौतुक केले, तर याच उपक्रमासाठी शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील चौकात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून दाद दिली. (Supriya Sule appreciated the work of MLA Ashok Pawar and Sujata Pawar)

महापुराने संकटात सापडलेल्या कोकणवासीयांसाठी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम शिरुर-हवेली मतदारसंघात आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने व रावलक्ष्मी फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आला. या वेळी संकटग्रस्त कोकणी कुटुंबांना पुढील काही महिने पुरेल असे दहा हजार किराणा किट पाठविण्यात आले. 

केवळ आठच दिवसांत संकलीत केलेल्या किराणा किटसह विविध गृहपयोगी वस्तूंनी भरलेल्या २९ ट्रक नुकत्याच सणसवाडी (ता. शिरूर) येथे आल्या होत्या. त्यावेळी सणसवाडीचे संपूर्ण ग्रामस्थ आमदार पवार यांच्या ताफ्याच्या स्वागताला पुणे-नगर महामार्गावर उपस्थित होते. या वेळी अनेकांनी पवार व त्यांच्या पत्नी माजी सभापती सुजाता पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले. विशेष म्हणजे या शुभेच्छा कार्यक्रमाला सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाला पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर, सभापती मोनिका हरगुडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, सणसवाडीच्या सरपंच सुनंदा दरेकर, उपसरपंच विजयराज दरेकर, माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे, ग्रामपंचायत सदस दत्ताभाऊ हरगुडे, रामभाऊ दरेकर, मारुती दरेकर, सुनिता दरेकर, ललिता दरेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांच्या वतीने त्यांचे भाऊ मनसेचे पदाधिकारी नवनाथ दरेकर, भाजपचे गजाभाऊ हरगुडे, शिवसेनेचे अमोल हरगुडे, कॉंग्रेसचे वतीने अशोक भुजबळ हेही उपस्थित होते. या सर्वांनी पवार यांच्या उपक्रमाचे तोंडभरुन कौतुक केल्याची माहिती पंडीत दरेकर यांनी दिली. दरम्यान कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव यांनीही या उपक्रमासाठी पवार यांना शुभेच्छा दिल्या. 

                 
दरम्यान, सुतारवाडी (ता. रोहा, जि. रायगड) येथील राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयापुढे हे २९ ट्रक पोचताच तटकरे यांनी पवार दांपत्यांचे स्वागत करत असताना खासदार सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ कॉल पवार यांना आला. या वेळी सुप्रिया सुळे यांनी अदिती तटकरे तसेच आमदार अशोक पवार व त्यांच्या पत्नी सुजाता पवार यांचे विशेष कौतुक केले. त्याबाबतची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. तसेच, याबाबतचे ट्विटही केले आहे. पवार यांच्या या भरीव कामाचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in