सांगलीतील मटका अडड्यांवर SP गेडाम तुडून पडले... - SP Gedam fell on Matka bases in Sangli  | Politics Marathi News - Sarkarnama

सांगलीतील मटका अडड्यांवर SP गेडाम तुडून पडले...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

मटका संपला असा कितीही दावा केला तरी जिल्ह्यात मटक्‍याचे पीक जोमात आहे.  शहरातील मध्यवर्ती ठिकाणी विशेषतः वर्दळीच्या ठिकाणी मटका खेळला जातो,

सांगली : जिल्ह्यातील मटका, जुगारांसह अवैध व्यवसांवर कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक पोलिस ठाण्यात देण्यात आले असून कारवाईत सातत्य ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात छापेसत्र सुरू असून दिवसांत पन्नासवर ठिकाणी छापे टाकण्यात आले. 

मटका संपला असा कितीही दावा केला तरी जिल्ह्यात मटक्‍याचे पीक जोमात आहे.  शहरातील मध्यवर्ती ठिकाणी विशेषतः वर्दळीच्या ठिकाणी मटका खेळला जातो, त्यामुळे पोलिस अधीक्षक गेडाम यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील मटका, जुगारसह ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, तीन पानी जुगार, कॅरम क्‍लबच्या नावाखाली अनेक प्रकारच्या अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पन्नासहुन अधिक ठिकाणी कारवाई करण्यात असून संशयितांना अटक करण्यात आली. शहरासह जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणच्या पोलिस ठाण्यांना कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे गेडाम यांनी सांगितले.

तसेच अवैध धंडे मोडीत काढण्यासाठी ऑक्‍शन प्लॅनही तयार करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे मटकेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख