पीक कर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण आल्यास सहकार निबंधकांशी संपर्क साधा!

जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कर्ज हवे असणाऱ्या शेतकऱ्यांनी गावातील विविध कार्यकारीसहकारी सोसायटीच्या सचिवांकडे मागणींचा अर्ज भरुन द्यावा.
solapur collector milind shambharkar appeals to farmer about crop loan
solapur collector milind shambharkar appeals to farmer about crop loan

सोलापूर : पीक कर्ज मिळण्यासाठी  कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी तालुक्याच्या सहकार निबंधक किंवा तहसीलदार कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
 
जिल्ह्यात पीक कर्ज वाटप अतिशय सुलभरित्या व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातील एक भाग म्हणून सहकार विभागाच्या यंत्रणेतून शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले. गर्दी टाळण्यासाठी  पीक कर्ज मागणीचा अर्ज ऑनलाईनही करता येईल अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या https://solapur.gov.in संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करावी, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे. त्याचबरोबर सहकार विभागाची यंत्रणाही याकामासाठी वापरण्याचे ठरविण्यात आले आहे.
 
याबाबत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कर्ज हवे असणाऱ्या शेतकऱ्यांनी गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवांकडे मागणींचा अर्ज भरुन द्यावा. त्यासाठी गटसचिव शेतकऱ्यांना मदत करतील. शेतकरी सोसायटीचा सभासद असेल आणि त्यास सोसायटी कडून पीक कर्ज मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज सोसायटी सचिवांकडे द्यावा.  सचिव हे अर्ज संबंधीत राष्ट्रीयकृत बँकाकडे पाठविणार आहेत.

याबाबत जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियानेही पुढाकार घेतला आहे. वेबसाईट द्वारे प्राप्त होणारे अर्ज छाननी करुन संबंधीत बँकाकडे प्रक्रियेसाठी पुढे पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत वेबसाईटवर 3649 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 2225 अर्जावर प्रक्रिया करण्यात आली. यामंजूर झालेल्या अर्जदार शेतकऱ्यांना सुमारे 25 कोटी रुपयांचे कर्ज मिळेल. उर्वरीत अर्जावर लवकरच प्रक्रिया केली जाऊन त्यांनाही कर्ज मंजूर केली जाईल अशी माहिती बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू यांनी दिली आहे.

'बार्टी'तर्फे MPSC परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास  

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग  सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कोरोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक  विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. नंतर मंत्री धनंजय  मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस तातडीने सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com