...म्हणून काँग्रेस मुंबईत लशीवरून आंदोलन करत आहे  ः सोमय्या

तर देशातील सर्व लोकांना लस मिळायला बारा महिने लागणारच आहेत.
So the Congress is agitating in Mumbai on corona vaccine : Kirit Somaiya
So the Congress is agitating in Mumbai on corona vaccine : Kirit Somaiya

सोलापूर : कोरोना लसीकरणावरून मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. पण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्धव ठाकरे सरकारमुळे झालेल्या कोविड हत्याकांडावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस हे आंदोलन करत आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. (... So the Congress is agitating in Mumbai on corona vaccine : Kirit Somaiya)
 
किरीट सोमय्या हे आज (ता. २९ मे) सोलापूर दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनाही माहितीय की, भारतात लशीचं उत्पादन दोन कंपन्या करतात आणि त्यातील महत्वाची कंपनी ही पुण्यात आहे. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांचं उत्पादन वर्षाचं 10 कोटी होत असेल, तर देशातील सर्व लोकांना लस मिळायला बारा महिने लागणारच आहेत, असं स्पष्टीकरण किरीट सोमय्यांनी लसीच्या तुटवड्यावर दिलं आहे. 

दरम्यान, एप्रिल महिन्यात जे मृत्यूकांड महाराष्ट्रात झालं आहे, त्याचा आणि लसचा काय संबंध आहे, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष येत्या काळात महाराष्ट्रातील कोविड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणारं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तेरा महत्वाच्या शहरांमध्ये किरीट सोमय्यांसह आणखी दोन सी. ए.मिळून हे ऑडिट केलं जाणार आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले. 

येत्या 31 डिसेंबरपर्यंत भारतात अडीचशे कोटी लशी भारतात उपलब्ध होणार आहे. त्या लशींमधून प्रत्येक भारतीयांचं लसीकरण 31 डिसेंबरपर्यंत झालेलं असेल, असंही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

शिवसेना नेत्यांसह राष्ट्रवादीच्या आव्हाडांनाही डिवचलं

सचिन वाझे याच्यासोबत पाच ऑफिसर निलंबित झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जाण्याची पाळी आली आहे, तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह घरी गेले आहे. आता पुढचा नंबर गृहमंत्री अनिल परब यांचा लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर आहे, असा खळबळजनक दावही सोमय्यांनी केला आहे. 

शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक हे फरारी आहेत. संजय राऊत यांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे गाळे ढापले आहेत, हे हायकोर्टात सिद्ध झालं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. आता परिवहन मंत्री अनिल परब आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे लाईनीत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असं म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांसह आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनाही डिवचलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com