आमच्यासाठी धक्कादायक, दुःखदायक, चिंतन करायला लावणारी घटना : मुनगंटीवार 

ओ जानेवाले हो सके तो लौट के आना...
Shocking, sad, thought-provoking events for us: Mungantiwar
Shocking, sad, thought-provoking events for us: Mungantiwar

पुणे : "नाथाभाऊ यांच्या राजीनाम्याची बातमी आमच्यासाठी नक्कीच धक्कादायक आहे. ज्यांनी 40 वर्षे भारतीय जनता पक्षाची सेवा केली, पक्ष वाढवला, ते खडसे आज कोणत्यातरी नाराजीतून पक्ष सोडून जात आहेत. ते आमच्यासाठी धक्कादायक, दुःखदायक आणि निश्‍चित चिंतन करण्यासारखे आहे,' अशी स्पष्ट कबुली माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुनगंटीवार हे बोलत होते. 

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार म्हणाले की, नाथाभाऊंचे पक्ष सोडणे जाणे आमच्यासाठी धक्कादायक आहे. पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे. कारण, खडसेंसारख्या नेत्याने सुमारे 40 वर्षे पक्षाची सेवा केली आहे. राज्यात पक्ष वाढविला आहे. एक चांगला नेता, ज्यांनी कष्टातून पक्ष वाढविला. ते खडसे कोणत्या तरी नाराजीतून आम्हाला सोडून जात आहेत, ते आमच्यासाठी धक्कादायक, दुःखदायक, आणि निश्‍चितपणे चिंतन करण्यासारखे आहे. 

खडसे हे सच्चा राष्ट्रवादाकडून बुरख्या घातलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जात आहेत, त्यामुळे मी निःशब्द आहे, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, खडसे यांनी पक्ष सोडून जाऊ नये, असे मला नेहमी वाटायचे. पण, त्यांनी लोकशाहीमधला निर्णय आहे. त्यांना मी एवढं म्हणेण की "ओ जानेवाले हो सके तो लौट के आना...', असे बंदिनी या चित्रपटाच्या गीतातून त्यांनी खडसे यांना पुन्हा भाजपत परतण्याची साद घातली. 

सुमारे 15 ते 20 दिवसांपूर्वी माझे त्यांच्याशी बोलणे. पण त्या वेळी ते पक्ष सोडतील असे वाटले नव्हते. खडसे यांच्या पक्षासाठी आमच्यापेक्षा मोठे योगदान होते. त्यांनी (स्व.) प्रमोद महाजनांसोबत काम केले होते आणि महाजनांचे असे म्हणणे होते की, पावला पावलांवर मनाविरोधात घडत असताना काम करणे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्य आहे. पण, खडसे यांचे पक्ष सोडून जाणे आमच्यासाठी नक्कीच चिंतन करायला लावणारे आहे. 

हेही वाचा : मी भाजप सोडणार नाही : खासदार रक्षा खडसे 

नवी दिल्ली : "आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे. पण, मी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. मी भाजपची खासदार म्हणून निवडून आले आहे, त्यामुळे मी भाजपतच काम करत राहणार आहे,' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नूषा खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंच्या राजीनाम्यावर दिली. 

नाथाभाऊंच्या बहुचर्चित राजीनाम्यानंतर रक्षा खडसे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्तीगत कारणामुळे भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुखदायक आहे. नाथाभाउंच्या निर्णयाचे आम्हाला पक्ष म्हणून दुःख आहे. 

पक्ष सोडण्याच्या बाबत रक्षा खडसे म्हणाल्या की मी भाजपकडून निवडून आले आहे. भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी मला निवडून दिले आहे. मी भाजपतच राहणार असून पक्षाचे काम करत राहणार आहे. पक्ष जो काही जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करणार आहे, असे सांगत आपण पक्ष सोडणार नसल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. 

आपण भाजपमध्ये कधीपर्यंत राहणार, या प्रश्‍नावर रक्षा खडसे म्हणाल्या की, याचे भाकित कुणीही करू शकत नाही. ज्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, त्यासाठी आपल्याला काम करत राहावे लागते. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com