जळगावमध्ये सत्ताधारी भाजपकडून १ कोटीचा गैरव्यवहार

कंत्राटदाराला आतापर्यत २ कोटी ४० लाख अदा केले. त्यात १ कोटी २० लाखांचा गैरव्यवहार आहे.
shivsena alleges bjp for one crore fraud in jalgaon corporation
shivsena alleges bjp for one crore fraud in jalgaon corporation

जळगाव : जळगाव महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांमध्ये मक्त्यावरून वाद सुरू असतानाच आता विरोधी पक्ष शिवसेनेनेही त्यात उडी घेतली असून सफाई मक्त्यात १ कोटी २० लाखाचा गैरव्यवहार करण्यात आलाचा आरोप केला आहे. या प्रकरणी लवकरच पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात येईल असे मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सांगितले आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देतांना महापालिकेतील विरोधी पक्ष नेते शिवसेनेचे सुनील महाजन म्हणाले कि, महापालिकेत ६ मार्चपासून एस. के. कंत्राटदाराला शहरात सफाईचा ठेका दिला गेला. या कंत्राटदाराला आतापर्यत २ कोटी ४० लाख अदा केले. त्यात १ कोटी २० लाखांचा गैरव्यवहार आहे. या ठेक्यात सत्ताधाऱ्यांची भागीदारी असल्याचा आरोपही त्यांनी केला. या मक्त्यात वॉटरग्रेस कंपनीला ज्या नियम अटींवर ठेका दिला होता त्या अटी एस. के. कंत्राटदाराला का लावल्या नाहीत. या कंत्राटदाराने आपल्या मजुरांचे अकौंट बँकेत काढलेले नाही. वाटरग्रेसला ५ वर्षासाठी ७५ कोटी देणार होते, एस. के. कंत्राटदाराला ८५ कोटी देताहेत. १० कोटींचा अपव्यय महापालिका करीत आहे.
 
नगरसेवकांना पैशाचे अमिष

एवढा मोठा ठेका विना निविदा दिला गेला आहे. या ठेक्याची निविदा काढायला हवी होती. मात्र तसे झालेले नाही. अधिकाऱ्यांचेही यात संगनमत आहे. महापालिका ठेकेदाराला एका मजुराचे वेतन दरमहा १६ हजार रुपये देते. ठेकेदार मात्र ७५०० रुपये कामगाराला देतो. यावरून कामगारांची पिळवणूक होते आहे हे सिद्ध होते. हा ठेका देताना सत्ताधारी गटातील प्रत्येक नगरसेवकाला वीस हजार रुपये दिले जातील असे सांगितले होते. मात्र आजपर्यंत एकाही नगरसेवकाला ही रक्कम मिळाली नसल्यामुळेच आता सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांत अतंर्गत वाद सुरू झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
पोलीसांत तक्रार देणार

एस.के.कंत्राटदाराच्या ठेक्यात काही सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांच्या नातेवाइकांची नावे मजूर म्हणून आहेत. आठ ते दहा नावे मी स्वतः पाहिलेली आहेत. आपण त्याबाबत पुरावेही देवू शकतो असेही महाजन यांनी सांगितले. महापालिकेतील या गैरव्यवहाराबाबत लवकरच शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येईल. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून गैरव्यवहाराची माहिती दिली जाईल. यावेळी शिवसेनेचे
महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक नितीन बर्डे यावेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com