आमदार दिलीप मोहितेंना माज आल्याचं दिसतंय : संजय राऊत

सध्याचे जे आमदार दिलीप मोहिते आहेत, त्यांनी ती जागा बदलण्यासाठी जे घाणेरडे राजकारण केले, ते निर्घृण आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut criticizes NCP MLA Dilip Mohite
Shiv Sena MP Sanjay Raut criticizes NCP MLA Dilip Mohite

पुणे : खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या जागेवरून या तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते ज्या प्रकारचे घाणेरडे राजकारण करत आहेत, ते माणुसकीला धरून नाही. तसेच, ते महाराष्ट्राच्या परंपरेलासुध्दा धरून नाही. आम्ही त्यांना अनेकदा विनंती केली, आम्ही अजितदादांनाही सांगितलं. मुख्यमंत्र्यांनीही विनंती केली. तरी हे महाशय रेटून नेतात, त्याला माज आलाय, असेच म्हणतात. अशा प्रकारचा माज हा स्थानिक सत्ता आपल्या हातात आहे, म्हणून जर कोणाला वाटत असेल की आपण काहीही करू शकतो, तर तसं होणार नाही. कारण, शिवसेना आहे. त्यासाठीच मी आज येथे आलो आहे, असा स्पष्ट इशारा खासदार संजय राऊत यांनी आमदार दिलीप मोहिते यांना दिला. (Shiv Sena MP Sanjay Raut criticizes NCP MLA Dilip Mohite)   

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधातील शिवसेनेच्या सदस्यांनी बंडखोरी करत अविश्वास ठराव आणला होता. त्यानंतर राडाही झाला होता. अविश्वास ठराव मंजूरही झाला. त्या बंडामागे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी खासदार राऊत हे आज (ता. ४ जून) राजगुरुनगर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी मोहिते यांना सुनावले.

संजय राऊत म्हणाले की, माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर मी गेल्यावर्षी खेडमध्ये आलो होतो. गोरे यांच्या मृत्यूनंतर एक वाद निर्माण झाला आहे, तो दुर्दैवी आहे. तत्कालीन आमदार असलेल्या सुरेश गोरे यांनी पंचायत समितीच्या इमारतीसाठी एक जागा निश्चित केली होती. त्या कामात त्यांचा आत्मा गुंतला होता. सध्याचे जे आमदार दिलीप मोहिते आहेत, त्यांनी ती जागा बदलण्यासाठी जे घाणेरडे राजकारण केले, ते निर्घृण आहे. जागा बदलल्यास काय फरक पडणार होता. 

माजी आमदार सुरेश गोरे यांनी निर्माण केलेले कार्य, त्यांची भावनिक गुंतवणूक त्या इमारतीच्या कामात आहे. लोकांचा आग्रहही पंचायत समितीची इमारत त्याच जागेवर व्हावी, अशी आहे. तरीही विद्यमान आमदारांना एवढी माणुसकी नसेल तर ते शरद पवारांच्या पक्षात राहण्यास लायक नाहीत. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे अत्यंत दिलदारीने केले आहे. त्यांनी अनेकदा विरोधकांनासुद्धा बरोबर घेऊन राजकारण केले आहे. अशा किरकोळ गोष्टींमध्ये शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विरोधकांना फार त्रास दिलेला नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या जागेवरून खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते ज्या प्रकारचे घाणेरडे राजकारण करत आहेत, ते माणुसकीला धरून नाही. तसेच, ते महाराष्ट्राच्या परंपरेलासुध्दा शोभणारे नाही, असेही राऊत यांनी नमूद केले.

खेडमध्ये परवा जो प्रकार झाला. पंचायत समितीच्या सदस्यांना दहशतीने आणि पैशांच्या आमिषाने पळवून नेले. अविश्वास ठराव मंजूर करताना जो येथे तमाशा करण्यात आला. तो आघाडीच्या कोणत्या नीती नियमांमध्ये बसतो. हे जर इकडच्या विद्यमान आमदाराला माहीत नसेल तर मला असं वाटतं. त्यांचे जे सर्वोच्च आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्यापर्यंत हा विषय आम्ही लवकरच नेणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com