सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयने काय दिवे लावले : शरद पवार 

आता हे प्रकरण भलतीकडेच चालले आहे. सत्य कधी बाहेर येईल, त्या वेळीच या प्रकरणाचा उलगडा होईल.
Sharad Pawar's criticism of BJP over Sushant Singh case
Sharad Pawar's criticism of BJP over Sushant Singh case

पंढरपूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर केंद्र सरकारचा विश्‍वास नसावा. त्यामुळे त्यांनी वेगळी एजन्सी (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, सीबीआय) नेमली. त्या एजन्सीने आत्तापर्यंत काय दिवे लावलेत? असा प्रश्‍न करून या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या भाजपला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टोला लगावला. 

पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पवार आज (ता. 29 सप्टेंबर) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपविण्यात यावा, या मागणीसाठी राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी रान उठविले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.

हे प्रकरण सीबीआयकडे सोपवून दीड महिना झाला तरी त्यांच्या हाती अद्याप ठोस काहीही लागलेले दिसत नाही. यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर शरद पवार यांनी वरील उत्तर दिले. 

सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिस करत असलेल्या तपासावर केंद्र सरकारचा विश्‍वास नसावा. त्यामुळे केंद्र सरकारने तपासासाठी सीबीआयची नेमणूक करण्यात आली. या प्रकरणी त्यांनी आत्तापर्यंत काय दिवे लावले. ते आम्हाला काय दिसत नाहीत. त्याचा प्रकाश आम्हाला बघायला मिळत नाही. त्यामुळे आता हे प्रकरण भलतीकडेच चालले आहे. सत्य कधी बाहेर येईल, त्या वेळीच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे शरद पवार या वेळी म्हणाले. 

आठवलेंना कोणीही गांभीर्याने घेत नाही ! 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार, खासदार जनतेतून निवडून आलेला नाही. ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात, त्यांची सभागृहात आणि बाहेरही कोणी गांभीर्याने नोंद घेत नाहीत, अशा शब्दांत शरद पवार यांनी आठवले यांच्या "एनडीए'त येण्याच्या आवाहनाची खिल्ली उडवली. शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे, असे आवाहन आठवले यांनी नुकतेच केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com