तो संजय शिंदे मी नव्हे 

अखेर त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत आपण सुखरूप असल्याचे सांगितले.
That Sanjay Shinde is not me
That Sanjay Shinde is not me

करमाळा (जि. सोलापूर) : गाडीला अचानक लागलेल्या आगीत नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संजय चंद्रभान शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र, अनेक वृत्तवाहिन्या आणि वेबसाइट्‌सनी गल्लत करत बातमीसोबत करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचा फोटो वापरला. त्याचा मनस्ताप आमदार शिंदे यांना सहन करावा लागला. अखेर त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत आपण सुखरूप असल्याचे सांगितले. 

मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा येथे कारमधील वायरींगचे शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. त्यात सॅनिटायझर पेट घेतला. या आगीने कार लॉक झाली. त्यामुळे पेटलेल्या कारमध्ये अडकलेले संजय चंद्रभान शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला. शिंदे साकोरे मीग येथील द्राक्ष निर्यातदार होते. साकोरे मीगच्या उपसरपंच निर्मला शिंदे यांचे ते पती होते. 

कारने पेट घेतल्यावर नागरिकांना ही घटना समजली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेचा अग्नीशामक दलाचा बंब देखील घटनास्थळी दाखल झाला. नागरिकांनी काच फोडुन शिंदे यांना बाहेर काढले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता.

समाजकारण, राजकारणात सक्रिय असलेले शिंदे हे अजातशत्रू होते. राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. साकोरे मीगच्या उपसरपंचपदी त्यांच्या पत्नी निर्मला शिंदे यांची दोन महिन्यांपूर्वी निवड झाली होती. 

ही बातमी दाखवताना काही वृत्तवाहिन्यांनी नाशिकचे संजय शिंदे यांच्याऐवजी करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांचा फोटो वापरला. आमदार शिंदे यांची उमेदवारी ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत होती. या शिवाय त्यांनी माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडूनच लढवली होती. त्यामुळे अनेक वाहिन्यांनी आमदार शिंदे यांचाच फोटो वापरला. 

मृत्यू पावलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संजय चंद्रभान शिंदे व आमदार संजय शिंदे यांच्या नावात असणारे साम्य व दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित असल्यामुळे अनेक वृत्तवाहिन्या व वेब पोर्टल यांच्याकडून आमदार शिंदे यांचा फोटो वापरला गेला.

या गफलतीमुळे करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांना अनेकांकडून फोनवरून विचारणार करण्यात येऊ लागली. कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरल्याने आमदार संजय शिंदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की नाशिक जिल्ह्यातील एका बातमीसंदर्भात नजरचुकीचे माझा फोटो वापरण्यात आलेला आहे. मात्र, आपण माढा तालुक्‍यातील निमगाव (टे.) येथील घरी सुखरूप असल्याचे सांगितले. 


Edited By vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com