पाणी द्या; नाही तर टाकीवरून उडी मारेन : सत्ताधारी भाजप नगरसेवकाचे आंदोलन

ऐन पावसाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसांतही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
Ruling BJP corporator's agitation for water in Solapur
Ruling BJP corporator's agitation for water in Solapur

सोलापूर : सोलापूर शहरात चार दिवसाआड पाणी होत आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही त्यात सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेले सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संतोष भोसले यांनी शोले स्टाईल आंदोलन केले. पोलिस आयुक्तालयांसमोरील टाकीवर नगरसेवक भोसले हे चढले होते. अखेर स्थानिक नागरिक व कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली आणले. (Ruling BJP corporator's agitation for water in Solapur)

सोलापूर शहरात ऐन पावसाळ्यात चक्क चार दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. एरवी उन्हाळ्यात हा पाणीपुरवठा झाला असता तर नागरिक समजू शकले असते. पण ऐन पावसाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसांतही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला वारंवार सूचना देऊन, बैठका घेऊनही शहरातील पाणीपुवरठा सुरळीत केला जात नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकावरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे. नगरसेवक भोसले यांनी महापालिका आयुक्तांच्या विरोधात हे शोले स्टाईल आंदोलन केले.

पाण्यासंबंधीचे तक्रारी लवकर दूर करेन, असे महापालिका आयुक्‍तांनी महिनाभरापूर्वी आश्‍वासन दिले होते. तरीही समस्या दूर झाल्या नाहीत.  अधिकारीदेखील नगरसेवकांची दखल घेत नसल्याने पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्यासाठी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संतोष भोसले हे पाण्याच्या टाकीवर चढले होते.  

सोलापूर शहरात पाण्याचे योग्य नियोजन नाही. प्रभागातील किरकोळ पाण्याच्या तक्रारी सोडविण्याचे काम देखील प्रशासन करत नाही. तसेच, अधिकाऱ्यांना फोन केले तरी दाद दिली जात नाही. आयुक्‍तांनी बैठक घेऊन महिना उलटला तरी उपाय योजना शून्यच आहे. लोकांचे प्रतिनिधी म्हणून प्रभागात फिरणे आम्हाला मुश्‍किल बनले आहे, असेही भोसले म्हणाले. 

प्रशासनाच्या मनमानी कारभाराला वैतागून पाणी द्या नाही तर टाकीवरून उडी मारेन, असे म्हणत नगरसेवक भोसले हे महापालिका आयुक्त यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढले होते. अधिकारी येईपर्यंत मी खाली उतरणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, स्थानिक नागरिक व कर्मचारी यांनी त्यांची समजून काढून त्यांना खाली आणले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com