'रयत'ने मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला का केला दूध-बेदाण्यांचा अभिषेक?

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा आणि बेदाण्याचा अभिषेक घालून सरकार विरोधी आंदोलन केल्याचे रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले.
Rayat Kranti Agitation at Pandharpur against Government
Rayat Kranti Agitation at Pandharpur against Government

पंढरपूर : गाईच्या दूधाला प्रती लिटर ३० रुपये आणि बेदाण्याला प्रति किलो २५० रुपये हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी  आज रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांच्या सरकारच्या  प्रतिकात्मक पुतळ्याला दूधाचा आणि बेदाण्याचा अभिषेक करुन सरकार विरोधी आंदोलन केले.

येथील तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली  कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी  आंदोलन केले. 'लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर शेतीमालाचे भाव पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशातच दूधाचेही भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचा  दूध व्यवसायही धोक्यात आला आहे. मागील चार महिन्यांपासून दूध दरात घसरण सुरु आहे. एकीकडे चारा आणि पशुखाद्याचे दर वाढत आहेत. तर दुसरीकडे मात्र दूध दरात घसरण सुरु आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशावेळी बेदाण्याची ही   कमी दरात खरेदी केली जात आहे,' असे यावेळी सांगण्यात आले.

हे प्रश्न व शेतकऱ्यांच्या अन्य विविध प्रश्नांकडे  मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा आणि बेदाण्याचा अभिषेक घालून सरकार विरोधी  आंदोलन केल्याचे रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले. यावेळी कांद्याला प्रती क्विंटल ५०० रुपये आणि शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज बिल माफ करावे, अशा  मागण्याही करण्यात आल्या. 

कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारचा प्रतिकात्मक कापडी पुतळा करुन आणला होता. पुतळ्याच्या गळ्यात कांद्याची माळ घालण्यात आली होती. आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्त होता. कार्यकर्त्यांनी पोलिसांची नजर चुकवून प्रतिकात्मक पुतळ्याला पाच लिटर दूध आणि पाच किलो बेदाण्याचा अभिषेक केला. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना प्रसाद म्हणून दूध आणि बेदाण्याचे वाटप ही केले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com