त्या प्रश्नावर फडणविसांनी अण्णांना पत्रकार परिषद सोडण्यास सुचविले

केंद्र सरकार जोपर्यंत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करत नाही, तोपर्यंत राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (ता.३० जानेवारी) पासून आंदोलन करणार होते. मात्र, भाजप नेत्यांनी त्यांची मनधरणी केली आणि अण्णांनी आंदोलन मागे घेतले.
 On that question, Fadnavis suggested Anna to leave the press conference.jpg
On that question, Fadnavis suggested Anna to leave the press conference.jpg

पुणे : दिल्लीत कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जोपर्यंत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करत नाही, तोपर्यंत राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (ता.३० जानेवारी) पासून आंदोलन करणार होते. मात्र, भाजप नेत्यांनी त्यांची मनधरणी केली आणि अण्णांनी आंदोलन मागे घेतले. 

यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल का असं विचारल्यावर, पत्रकार परिषदेत त्यांच्या शेजारी बसलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्क अण्णांना पत्रकार परिषद अर्धवट सोडण्यास सुचवलं. प्रश्न उत्तरं घ्यायलाच नको असं म्हणत देवेंद्र फडणवीस खुर्चीतून उठू लागले, हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

30 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी जाहीर केलं होतं. दिल्लीमधील शेतकरी आंदोलन महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेलं असतानाच, अण्णा राळेगणमध्ये उपोषण सुरु करणार म्हटल्यावर देशभर त्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. 

आंदोलनाच्या आधी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, बबनराव पाचपुते यांच्यासह अण्णांना भेटायला राळेगणसिद्धीमध्ये पोहोचले. या नेत्यांसोबत अण्णांनी राळेगणमध्ये बंद खोलीत अडीच तास चर्चा केली आणि अचानक अण्णांचं मन बदललं. स्वामीनाथन आयोग कसा लागू करता येईल, यासाठी केंद्र सरकारकडून अण्णांना पंधरा मुद्द्यांचा मसुदा देण्यात आला आणि दुपारपर्यंत आंदोलनावर ठाम असलेल्या अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

तो निर्णय माध्यमांना सांगण्यासाठी अण्णा हजारेंसह केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सयुंक्त पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं आणि सगळी मंडळी बंद खोलीतून बाहेर पडली. पत्रकार परिषदेत कैलाश चौधरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने अण्णांच्या मागणीनुसार स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. या समितीत अण्णांनी सुचवलेल्या व्यक्तींना घेण्यात येईल असंही सांगण्यात आलं. 

या दोन नेत्यांच्या संबोधनानंतर अण्णा हजारेंनी देखील केंद्र सरकारच्या समिती गठित करण्याच्या निर्णयावर आपण समाधानी असल्याचं म्हटलं. यावेळी पत्रकारांनी अण्णा हजारेंना आंदोलन मागे घेतल्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल का असं विचारल असताना फडणवीस यांनी प्रश्न उत्तरेच नको, तर पत्रकार परिषद सुद्धा बंद करण्याची विनंती अण्णा हजारे यांना केली. या व्हिडिओची चर्चा सध्या संपूर्ण राज्यभरात होत आहे. 
 

Edited By - Amol Jaybhaye      

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com