प्रकाश आंबेडकरच दारुडे; रामदास आठवलेंचा टोला - Prakash Ambedkar is a drunkard; Ramdas Athavale's tola | Politics Marathi News - Sarkarnama

प्रकाश आंबेडकरच दारुडे; रामदास आठवलेंचा टोला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

 एक दारुडाच दुसऱ्या दारुडा म्हणू शकतो, असा सणसणीत टोला रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीच  नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

पंढरपूर :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले आज पंढरपूर दौर्यावर आले होते .यावेळी पत्रकाराशी बोलताना, एक दारुडाच  दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो, असा सणसणीत टोला रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीच  नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना आज लगावला. 

मंत्री आठवले यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टिकेचा खरपूस समाचार घेतला. आठवलेंच्या या वक्तव्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

मंत्री आठवले म्हणाले,राज्यात भारतीय जनता पक्ष - रिपब्लिकन पक्षाची युती भक्कम आहे. आमच्या युतीमध्ये आम्हाला राज ठाकरेंच्या पक्षाची गरज नाही. उलट ते आमच्या बरोबर आल्यास आमचे मतदान कमी होईल.असा टोला राज ठाकरेंना  देखील लगावला.

कंगनाला एक कलाकार म्हणून आमचा पाठिंबा आहे. पण तीच्या देशविरोधी वक्तव्याला पाठिंबा नसल्याचे त्यांनी सांगितले. बिहार निवडणूकीत भारतीय जनता पक्ष आणि जेडीयुची सत्ता येणार आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पत्रकाराशी संवाद साधताना आठवले म्हणाले ,जरी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले तरी त्यांच्या सोबत कुणी जाणार नाही. आणि जरी गेले तर त्यांना काही मिळणार नाही. भाजपमध्ये  देखील इनकमिंग सुरु होईल असा आशावाद आठवले यांनी  व्यक्त केला.

दरम्यान ,मंत्री आठवले यांनी आज अतिवृष्टी झालेल्या भंडीशेगाव येथे जावून नुकसान झालेल्या पिकांची आणि फळबांगाची पाहणी केली.

यावेळी राजाभाऊ सरवदे,सुनील सर्वगोड, आप्पासाहेब जाधव, किर्तीपाल सर्वगोड, संतोष पवार, जितेंद्र बनसोडे  आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख