अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या भूमीपुजनावरून दोन आमदारांमध्ये श्रेयवाद  - Politics of Credit Started in Two MLA's in Pandharpur | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या भूमीपुजनावरून दोन आमदारांमध्ये श्रेयवाद 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

पंढरपूर : येथील  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळयाच्या जागा भूमीपूजनावरून भाजप आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे.

पंढरपूर : येथील  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळयाच्या जागा भूमीपूजनावरून भाजप आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे.

पूर्वीची अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळयाची जागा महामार्गाच्या कामात बाधीत झाल्याने  नगर पालिकेने पुतळयासाठी पर्यायी  जागा उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे  पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान जागेच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके आणि भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी एकाच जागेचे दोन वेळा भूमिपूजन केल्याने राजकीय श्रेयवाद चव्हाट्यावर आला आहे.

पंढरपूर - सांगोला राष्ट्रीय महामार्गामुळे सांगोला चौकातील अण्णाभाऊ साठेंच्या पुतळयाची जागा बाधीत झाली आहे. त्यामुळे शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयासाठी नगरपालिकेने  जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार नगरपालिकेने नवीन भक्तनिवास शेजारी ४ हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून दिली आहे.  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता स्थानिक पातळीवर देखील त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख