Police demanded a bribe of Rs 30,000 to release the sand trolley
Police demanded a bribe of Rs 30,000 to release the sand trolley

वाळूची ट्रॉली सोडून देण्यासाठी पोलिसाने मागितली ३० हजारांची लाच 

तक्रारदार व पोलिस नाईक यांचे संभाषणदेखील झाले होते.

मंगळवेढा  (जि. सोलापूर) : पकडलेली वाळूची ट्रॉली सोडून देण्यासाठी वरिष्ठाचे नाव सांगून ३० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या मंगळवेढा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक संतोष चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण हा वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत असतो. (Police demanded a bribe of Rs 30,000 to release the sand trolley)

माण व भीमा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असून बोराळे येथील तक्रारदाराची वाळूची ट्रॉली पोलिसांनी पकडली होती. परंतु ती सोडवण्यासाठी वरिष्ठांचे नाव सांगून 30 हजार रुपये रक्कम मागत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. तक्रारदार व पोलिस नाईक यांचे संभाषणदेखील झाले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार चौकशी केली असता वाळूच्या पकडलेल्या ट्रॉलीवर कारवाई न करता ती सोडण्यासाठी व वाळूचा हप्ता साहेबांना द्यावा लागतो, अशा पद्धतीने साहेबांचे नाव सांगून 30 हजार रुपये लाचेची मागणी करून आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. 

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्याचे अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलिस नाईक विनोद राजे, पोलिस कॉन्स्टेबल काटकर व भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवेढा पोलिस ठाणे दरवर्षी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. या पूर्वी गुटखा, दारु, मटका व इतर गुन्ह्यांच्या माध्यमातून सातत्याने चर्चेत राहिलेले आहे. येथील अनेक अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com