सोलापुरात 93 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त

आजीबाईंच्या इच्छाशक्तीमुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण केले नाही.
सोलापुरात 93 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त
सोलापुरात 93 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त

सोलापूर : सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील 93 वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या आहेत.

घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर....दुसरी मुलगी कर्णबधीर... अशा परिस्थितीत 93 वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क भावाशी आला होता, यातूनच आजीला कोरोनाची बाधा झाली होती.

भाऊ मृत झाल्याने तालुका प्रशासनाला समजल्यानंतर पारधी वस्तीवर वेळेत उपाययोजना केल्या. आजींचा स्वॅब 13 जूनला घेण्यात आला, त्या काळात आजीला टाकळी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात त्यांना सकस आहार देण्यात आला. संघर्ष करण्याची सवय, रोगप्रतिकारशक्ती आणि जगण्याची इच्छाशक्ती यामुळे आजी घाबरल्या नाहीत. त्यांनी दाखविलेले धैर्य सर्वांना अनुकरणीय आहे.

आजीबाईंच्या इच्छाशक्तीमुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण केले नाही. सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आजींना ठेवण्यात आले होते. याठिकाणी वेळेवर दोनवेळा चहा, भरपेट जेवण दिलं जात होत. रोज डॉक्टर तपासणी आणि रूग्णांची विचारपूस करून जात असत. डॉक्टरांनी दिलेला आधार यामुळेच रूग्णांचा निम्मा आजार हद्दपार होत आहे. आजीबाई कोरोनाला धीराने तोंड देत होत्या. 14 दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर शनिवारी (27 जुलैला) आजीबाई कोरोनामुक्त होऊन घरी आल्या आहेत. मला पहिल्यापेक्षा आता अधिक चांगले वाटत आहे, असे त्यांनी सांगितले. 

दुपारी आयुर्वेदिक काढा आणि काही औषध दिली जात होती, यामुळे मला आजारी असल्याचे जाणवलेच नाही. दोन वेळा जेवण करून निवांत झोप घेत होते. घरातल्यापेक्षा चांगली सोय झाली होती, फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटायचं कोंडून असल्याने ओळखीची लोकं बोलायला नसायचे.

रामराजेंना जे जावयाच्यावेळी जमले, ते आता भावाच्यावेळी जमणार कां?

पुणे: सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना आता चुलत बंधू संजीवराजेंना आमदार करण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शब्द टाकला आहे. यासंबंधाने शरद पवार काय निर्णय घेतात, हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

रामराजेंनी 2014 ला जावई राहूल नार्वेकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार केले होते. ता राज्यपालनियुक्त आमदारपदासाठी त्यांनी बंधू संजीवराजे यांचे नाव पुढे केले आहे. संजीवराजे अनेक वर्षापासून सातारा जिल्हा परिषदेत आहेत. फलटण तालुक्याच्या कोणत्याही मतदारसंघातून निवडून येण्याची त्यांची ख्याती आहे. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षही होते. त्यांचे सहकारातही मोठे काम आहे. त्यांचा बा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com