पडळकरांचे स्वागत करणाऱ्या त्या नगरसेवकाची हकालपट्टी निश्चित

या प्रकाराची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. त्याची चौकशी सुरू असून त्यानंतर कारवाई करण्यात येईल.
ncp will take action against jath council member timu edake who welcomes padalkar
ncp will take action against jath council member timu edake who welcomes padalkar

सांगली: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत दौऱ्यात त्यांचे स्वागत करून दुचाकीवरून फिरवणाऱे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक टिमू एडके यांच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याबद्दल राष्ट्रवादीकडून पडळकरांचा निषेध सुरू आहे. या परिस्थितीत पडळकर काल जत दौऱ्यावर होते. तिथे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर पडळकर हे राष्ट्रवादीचे नगरसेवक टिमू एडके यांच्या दुचाकीवरून जत शहरात फिरले. पडऴकरांच्या स्वागत कार्यक्रमात एडके अग्रभागी होते. यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर पाटील म्हणाले, या प्रकाराची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. त्याची चौकशी सुरू असून त्यानंतर कारवाई करण्यात येईल.

पडळकरप्रकरणी अनिल गोटेंचा हल्लाबोल

पुणे : "शरद पवार यांना गोपीचंद पडळकरांनी कोरोना असं म्हटले असले तरी मी देवेंद्र फडणवीस यांना 'महाराष्ट्राला लागलेला महारोग" असं म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी तसे म्हणणार नाही," असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे.

"धनगर समाजातील माझ्यासह नानाभाऊ कोकरे, अण्णासाहेब डांगे, प्रकाश शेंडगे हे भाजपच्या जातीवादाचे बळी आहेत. पडळकरांना भाजपच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हा ते शुद्धीवर येतील, "असं गोटे यांनी म्हटलं आहे. 

"आमदारकी मिळून आठ दिवसही झाले नाहीत तोवर पडळकर यांना आमदारकीची नशा चढली आहे. पडळकर यांना भाजपच्या उच्चवर्णीय विचारांची पुसटशीही कल्पनाही आलेली नाही. एका आमदारमुळे ते पुरते भाजपचे समर्थक होऊन बसले पण एक दिवस त्यांना भाजपच्या धोकाबाजीचा झटका बसेल, तेव्हा त्यांना कळेल," असे गोटे यांनी म्हटले आहे.

"नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्यासारख्या बुद्धिमान माणसाला भाजपने देशोधडीला लावले. त्यांच्या स्वतःच्या त्याकाळात कार होत्या पण आज त्यांचे धुळ्यात घरही नाही. १९५७ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत ते जनसंघाचे खासदार होते त्यांनी पक्ष वाढीसाठी अहोरात्र कष्ट घेतले मात्र त्यांच्या नावाचा विसर भाजपला पडला आहे. त्याचवेळी केवळ कसबा पेठ मतदारसंघाचे राजकारण करणाऱ्या आणि घर सोडावे लागते म्हणून पक्षाची कोणतीही जबाबदारी न घेणाऱ्या रामभाऊ माळगी यांच्या नावाने मात्र पंचतारांकित संस्था उभा केल्या आहेत. जे पक्ष वाढीसाठी झटले त्यांना बाजूला करण्यात आले पण उपेक्षित ठेवले,"असे गोटे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com