आमदार भालकेंनी कार्यकर्त्यांसह घेतला माडग्याचा आस्वाद 

मंगळवेढा शहरात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत औषधी असलेल्या हुलग्यापासून तयार केलेल्या माडग्याचा आस्वाद घेण्यासाठीकार्यकर्त्यांना बाजार चौकातील कृष्णा आयुर्वेदिक औषधालयात नेले.
MLA Bharat Bhalke tasted Madge with activists
MLA Bharat Bhalke tasted Madge with activists

मंगळवेढा : गेल्या सहा महिन्यांपासून असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःला लॉकडाऊन करून घेतले, तर काही जनतेसाठी नियम पाळून सक्रीय आहेत. पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके कोरोना काळात जनतेच्या अडी अडचणीला धावून येत आहेत. भालके यांनी आजही (ता. 19 सप्टेंबर) मंगळवेढा तालुक्‍याच्या ग्रामीण भागाचा दौरा केला. त्यानंतर औषधी असलेल्या हुलग्याच्या माडग्याचा आस्वाद घेतला. 

आमदार भारत भालके यांनी तळसंगी, रड्डे येथील मृत कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर तालुक्‍यात पावसामुळे आलेल्या पूर परिस्थितीची आणि नुकसानीची पाहणी केली. संबंधित प्रशासनाला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. 

मंगळवेढा शहरात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत औषधी असलेल्या हुलग्यापासून तयार केलेल्या माडग्याचा आस्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांना बाजार चौकातील कृष्णा आयुर्वेदिक औषधालयात नेले. हे माडगे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आणि कणकण यासाठी उपयुक्त असून माडगे हे उत्तम आयुर्वेदीक औषध समजले जाते. अलीकडच्या काळात हुलग्याचे पीक अत्यंत कमी प्रमाणात घेतले जात आहे. त्यामुळे सहजासहजी हुलगे उपलब्ध होत नाहीत. हुलग्यासाठी किमतही जादा मोजावी लागत आहे. 

अशा परिस्थितीत कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी मानवी शरीराला आवश्‍यक असलेले व्हिटॅमीन सी, लोह, आयर्न, कॅल्शिअम, झिंक फॉस्फरस, ही सर्व पोषणद्रव्ये या हुलग्याच्या माडग्यातून मिळत असल्यामुळे हे माडगे महत्वपूर्ण आहे. सध्या बाजारात हुलग्याचा तुटवडा आहे. 

 आयुर्वेदामध्ये हुलग्याच्या माडग्याला विशेष महत्त्व आहे. सध्या कोरोना विषाणूच्या महामारीत सर्दीवर मात करण्यासाठी मांडगे अत्यंत उपयुक्त आहे. मी लहानपणापासून गाडग्यातील माडगे घेत असे. मंगळवेढ्यात उपलब्ध झाले म्हणून कार्यकर्त्यांसह माडग्याचा आस्वाद घेतला. 

-भारत भालके, आमदार पंढरपूर-मंगळवेढा 

जुन्या काळापासून आयुर्वेदीक औषध असलेल्या हुलग्याच्या माडग्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने कोरोनाची साथ आल्यापासून मागणी वाढली आहे. 
-वैशाली भोसले, चालक कृष्णा आयुर्वेदिक औषधालय 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com