पडळकर समर्थकांच्या ट्रोलिंगमुळे हैराण झालेल्या रमेश पाटलांची पोलिसांकडे धाव

'गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या धमक्यांचा मला मानसिक त्रास होत आहे,'असे पाटील यांनी म्हटले आहे.
 NCP activist ramesh patil lodged complaint
NCP activist ramesh patil lodged complaint

माळशिरस (सोलापूर) :"शरद पवार यांनी धनगर समाजाला जेव्हा आरक्षण दिले तेव्हा गोपींचंद पडळकर पाळण्यात होते. हे खरं मांडलं म्हणून पडळकरांचे कार्यकर्ते मला फोन करून शिव्या देत आहेत. धमक्या देत आहेत," असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य रमेश पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार केली आहे.

'गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या धमक्यांचा मला मानसिक त्रास होत आहे,'असे पाटील यांनी म्हटले आहे.
माळशिरस पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार अर्जात रमेश पाटील यांनी म्हटले आहे, "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याबद्दल भाजपचे आमदार गोपींचंद पडळकर यांनी अपशब्द काढल्यावर मी पडळकर यांच्यावर टीका केली. या टिकेनंतर पडळकर यांचे कार्यकर्ते मला रात्री अपरात्री फोन करून शिवीगाळ करत आहेत. त्यामुळे मला आणि माझ्या कुटूंबियांना मानसिक त्रास होतो आहे. तरी आपण योग्य ती कारवाई करावी." तक्रार अर्जासोबत पाटील यांनी त्यांना ज्या फोन नंबरवरून धमकीचे कॉल आले आहेत त्याची यादी जोडली आहे.

रमेश पाटील म्हणाले, "आता जे धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे ते शरद पवार यांच्यामुळे मिळाले आहे ते आरक्षण जेव्हा मिळाले तेव्हा गोपीचंद पडळकर पाळण्यात होते. पडळकर यांनी धनगर समाजासाठी काय केले आहे. त्यांनी समाजासाठी केलेले एक काम सांगावे. फक्त भडक भाषणे करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यांना कोणतीही विचारधारा नाही. स्वतच्या स्वार्थासाठी ते पक्ष बदलत आले आहेत" असं पाटील म्हणाले. 

पडळकरांच्या आटपाडीतील 140 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश?

विटा (सांगली): भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण ताजे असतानाच राष्ट्रवादीने पडळकरांचे प्रभावक्षेत्र असलेल्या आटपाडी तालुक्यात पक्षबांधणीवर जोर दिला आहे. या वादाच्या पार्श्वभुमीवर पडळकरांच्या दुसऱ्या फळीतील 140 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.

सुरुवातीला शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षण दिलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते पण समाजाचा भ्रमनिरास झाला आहे. भाजप फसवा पक्ष आहे हे लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लोक आता भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत. आटपाडी तालुक्यातही भाजपला कंटाळून अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 
-बाबासाहेब मुळीक 
कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सांगली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com