सोलापुरात मटन खाणे पडले महागात ; विक्रेत्याला लागण, तीनशे जणांचा शोध सुरू - Mutton seller in Solapur infected with corona, search for 300 citizens continues | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापुरात मटन खाणे पडले महागात ; विक्रेत्याला लागण, तीनशे जणांचा शोध सुरू

महेश जगताप 
बुधवार, 20 मे 2020

सोलापूर शहरातील मोरारजी पेठेत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठ दिवसात त्या रुग्णाचा तीनशेच्या आसपास ग्राहकांशी संपर्क आला आहे.

पुणे :  सोलापूर शहरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असतानाच एका मटण विक्रेत्याला करोनाची लागण झाली आहे. सोलापूर शहरातील मोरारजी पेठेत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठ दिवसात त्या रुग्णाचा तीनशेच्या आसपास ग्राहकांशी संपर्क आला आहे. त्यामुळे अनेक जणांना मटण खाणे महागात पडले आहे. किती जणांना लागण झाली आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित रुग्णाचा मटण आणि चिकन सेंटरचा व्यवसाय आहे .शहरातील बऱ्याच  व्यापाऱ्यांनी मांसाहारी सेंटर बंद केले असल्यामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणाहून ग्राहक येत होते. त्यामुळे प्रशासनाने दखल घेत बंद करायला सांगितले होते, पण तरीही हा रुग्ण ग्राहकांना चिकन, मटण घरून पुरवठा होत होता. संबंधित रुग्णाचा तीनशेच्या  आसपास ग्राहकांशी संपर्क आला असल्याचे बोलण्यात येत आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

आजपर्यंत ४७४३ संशयित रुग्णांची तपासणी

आठ दिवसात कोणत्या ग्राहकांशी संपर्क आला त्याची माहिती घेण्याचे काम प्रशासन करीत आहे . सोलापूर शहरातील महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संतोष नवले यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णांच्या घरातील सदस्यांना ताब्यात घेतले आहे व इतर नागरिकांचा शोध सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. आजपर्यंत ४७४३ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४६१२ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. अजून १३१ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालपैकी ४५६ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख