भरचौकात सर्व रुग्णवाहिका जाळण्याचा आमदाराचा इशारा 

गरजू रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नाहीत. त्यांना वेळेत रुग्णवाहिका पाठवा; अन्यथा हिंगोलीच्या गांधी चौकात सर्व रुग्णवाहिका जाळून टाकू
santosh bangar .jpg
santosh bangar .jpg

हिंगोली : गरजू रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नाहीत. त्यांना वेळेत रुग्णवाहिका पाठवा; अन्यथा हिंगोलीच्या गांधी चौकात सर्व रुग्णवाहिका जाळून टाकू, असा इशारा शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे.

जिल्ह्यात सरकारच्यावतीने पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या असताना देखील, प्रसूती अपघात यासह अनेक गरजवंत रुग्णांना वेळेत  १०८ व १०२ रुग्णवाहिका मिळत नाहीत, असा आरोप बांगर यांनी केला आहे. 

मतदार संघातील नागरिक मला वारंवार फोन करतात, त्यानंतर मला तुमच्या व्यवस्थापनाशी रुग्णवाहिका पाठवण्यासाठी बोलावं लागतं, मी बोलुन देखील अर्धा तास, एक तास रुग्णवाहिका पाठवल्या जात नाही, अनेक वेळा फोन सुद्दा उचलला जात नाही.

मी तुम्हाला पाच दिवसाची मुदत देतो, सुधारणा करा अन्यथा तुमच्या सगळ्या  रुग्णवाहिका हिंगोलीच्या गांधी चौकात आणून जाळून टाकू, असा सज्जड दमच बांगर यांनी फोनवरून रुग्णवाहिका व्यवस्थापनाला दिला आहे.  

संतोष बांगर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, आडमुठेपणा करणारे रुग्णवाहिका प्रशासन ताळ्यावर येणार का? असा सवाल सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. 

राज्य सरकारच्या वतीने १०८ रुग्णवाहीका सेवा राज्यभरात पुरवली जात आहे. वेळेत आरोग्य सुविधा वेळेत मिळावी हा या मागचा उद्देश आहे. मात्र, ग्रामीण भागात रुग्णवाहिकेला फोन केला की, वेळेवर कधीच उपलब्ध नसते. असा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात असतो. त्याची दखल घेत बांगर यांनी रुग्णवाहिका व्यवस्थापनाला चांगलाच दम भरला. 

हे ही वाचा...

राज्यपालांकडे कंगनासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांना भेटायला नाही; शरद पवारांचा टोला 

मुंबई : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे दोन महिन्यांपासून अधिक काळ सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील शेतकरी मुंबईत एकवटले आहेत. शेतकरी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटून निवेदन देणार होते. मात्र, कोश्यारी हे गोव्याला गेले आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. 

राज्यभरातील लाखो शेतकरी आझाद मैदानावर जमले आहेत. त्यांच्यासमोर बोलताना शरद पवार म्हणाले की. राज्याभरातील शेतकरी निवेदन देण्यासाठी आलेले असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोव्यात जाऊन बसले आहेत. मागील वर्षी मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना राणावतच्या घराचा काही भाग पाडल्यानंतर तिला भेटायला त्यांच्याकडे वेळ होता. परंतु, शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com