राष्ट्रवादीला अस्मान दाखवणाऱ्या आवताडेंचा भाजप कार्यकारिणीत सत्कार

पंढरपूरमधील विजयाला भाजपच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे.
MLA Samadhan Avtade felicitated for giving historic victory to BJP
MLA Samadhan Avtade felicitated for giving historic victory to BJP

मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अस्मान दाखवून भारतीय जनता पक्षाला प्रथमच या मतदारसंघात विजय मिळवून देणारे आमदार समाधान आवताडे यांचा भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सत्कार करण्यात आला. ही निवडणूक जिंकून भाजपचे अनेक हेतू साध्य झाल्याने पंढरपूरमधील विजयाला पक्षाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. (MLA Samadhan Avtade felicitated for giving historic victory to BJP)   

भारतीय जनता पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईतील वसंत स्मृती भवनात आज (ता. २४ जून) पार पडली. या कार्यकारिणीत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीने आमदार आवताडे यांचा सत्कार केला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,  आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे, श्रीकांत भारतीय आदी उपस्थित होते. 

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर अवघ्या काही महिन्यांत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पंढरपूरची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससह  महाविकास आघाडी सरकारने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनेक मंत्री प्रचाराच्या निमित्ताने पंढरपूर-मंगळवेढा परिसरात ठाण मांडून होते. विशेषता ग्रामीण भागातदेखील त्यांनी सभा घेतल्या. भारतीय जनता पक्षात गेलेल्या अनेक नेत्यांचे राष्ट्रवादीत प्रवेशदेखील केल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड झाले होते. 

भाजप नेत्यांनी मात्र प्रयत्न न सोडता निकाराने झुंज दिली. आमदरा प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये समेट घडवून आणली. परिचारकांची ताकद आवताडे यांच्या पाठीशी उभी केली. राज्यातील जनतेला 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेली महाविकासआघाडी मान्य नाही. जनतेचा रोष त्यांच्या विरोधात आहे, हे दाखविण्यासाठी भाजपनेदेखील कंबर कसली.

 
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीतील भाजपचे पराभूत उमेदवार आमदार आवताडे यांच्या प्रचाराला आले. जे स्वतः विजयी झाले नाहीत, ते अवताडे यांना कसे विजयी करणार, अशा प्रकारची खिल्ली महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी पंढरपूर मंगळवेढ्यातील प्रचाराच्या दरम्यान उडवली. पण, भाजप नेत्यांनी खचून न जाता नेटाने किल्ला लढवला. अतिशय चुरशीच्या लढतीत आमदार समाधान आवताडे हे विजयी झाले. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात वातावरण आहे, हे जनतेच्या मनामध्ये उतरविण्यास भाजपचे नेते यशस्वी ठरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com