आई-वडिलांचा आमदारकीचा वारसा चालविणारे राहुल कुल ठरले उत्कृष्ट संसदपटू - MLA Rahul Kul was given the  Best Parliamentarian Award | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आई-वडिलांचा आमदारकीचा वारसा चालविणारे राहुल कुल ठरले उत्कृष्ट संसदपटू

रमेश वत्रे
शुक्रवार, 9 जुलै 2021

फडणवीस यांच्या ‘गुड बुक’मध्ये कुल यांचे नाव असल्याने त्यांचे मंत्रीपदही निश्चित मानले जात होते.

केडगाव (जि. पुणे) : दौंडचे आमदार राहुल कुल यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने उकृष्ठ संसदपटू म्हणून गौरविण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (MLA Rahul Kul was given the 
Best Parliamentarian Award)
  
मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमास माजी आमदार रंजना कुल, भाजपच्या जिल्हा महिलाध्यक्षा कांचन राहुल कुल उपस्थित होत्या. दौंड विधानसभा मतदार संघाची १९६२ मध्ये  पुनर्रचना झाली. त्यानंतर प्रथमच दौंडच्या आमदारास हा सन्मान मिळाला आहे. राहुल कुल व त्यांचे वडील सुभाष कुल या दोघांनीही बंड करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला आहे. सुभाष कुल यांना विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्षपद मिळाले होते.

हेही वाचा : भाजपला मला संपवायचे नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले...

राहुल कुल यांना २०१४ मध्ये मंत्रिपद मिळणार होते. मात्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी हे मंत्रिपद स्वतःकडे ठेवल्याने त्यांची मंत्रीपदाची संधी हुकली होती. दरम्यानच्या काळात राहुल कुल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन केला. विधानसभेच्या २०१९ निवडणुकीत पुणे जिल्ह्यात भाजपची मोठी पडझड होत असताना राहुल कुल हे एकमेव भाजपचे आमदार निवडून आले. 

फडणवीस यांच्या ‘गुड बुक’मध्ये कुल यांचे नाव असल्याने त्यांचे मंत्रीपदही निश्चित मानले जात होते. मात्र, भाजप सत्तेपासून दूर राहिल्याने ते शक्य झाले नाही. दौंडमध्ये १९६२ ते २०१४ पर्यंत आमदारांच्या मुलांना विधानसभेत प्रवेश मिळवता आलेला नव्हता. हे रेकॅार्डसुद्धा राहुल कुल यांनी २०१४ ला मोडून काढले. कुल विरोधी पक्षातील आमदार असले तरी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून तालुक्यात विकास निधी आणण्यात त्यांना यश मिळत आहे. 

विधानसभेतील दुर्मिळ उदाहरण

आई-वडील-मुलगा या तिघांनीही विधानसभेत प्रवेश करण्याची राज्यात दोनच उदाहरणे आहेत. एक म्हणजे कन्नड (जि. औरंगाबाद ) विधानसभा मतदार संघातील आमदार रायभान जाधव, त्यांच्या पत्नी व मुलगा हर्षवर्धन जाधव आणि दुसरे उदाहारण दौंड तालुक्यातील सुभाष कुल, रंजना कुल, राहुल कुल यांचे आहे. पुणे जिल्ह्यात हे एकमेव उदाहरण आहे. घोडा, पंजा, घड्याळ, कपबशी, कमळ अशा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवून कुल कुटुंबीयांनी विधानसभेत प्रवेश केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख