अक्कलकोटशी माझे जुने ऋणानुबंध : जोतिरादित्य शिंदे 

विमातळाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करेन.
अक्कलकोटशी माझे जुने ऋणानुबंध : जोतिरादित्य शिंदे 
MLA Kalyan Shetty met Jotiraditya Shinde for Boramani Airport issue

अक्कलकोट : सोलापूर खासकरून अक्कलकोट तालुक्याशी माझे जुने ऋणानुबंध आहेत, त्यामुळे बोरामणी विमातळाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करेन, अशी ग्वाही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिली. (MLA Kalyan Shetty met Jotiraditya Shinde for Boramani Airport issue)     

सोलापूर जिल्ह्यासाठी सध्या गरजेचे प्रश्न बनलेले बोरामणी गावातील नवीन ग्रीन फील्ड विमानतळाचा विकास जलदगतीने होण्यासाठी विशेष लक्ष देऊन हा प्रश्न लवकर मार्गी लागावा, यासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या वेळी शिंदे यांनी आमदार कल्याणशेट्टी यांना वरील ग्वाही दिली. 

आमदार कल्याणशेट्टी यांनी मंत्री शिंदे यांना बोरामणी विमानतळाची सध्या सुरू असलेल्या कामांची स्थिती आणि आणखी कोणती कामे अपेक्षित आहेत. तसेच, हे विमानतळ पूर्ण झाल्यानंतर सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांना होणारा लाभ याचीही माहिती दिली. 

शिंदे यांना दिलेल्या निवेदनात आमदार कल्याणशेट्टी यांनी म्हटले आहे की, ज्या बोरामणी येथील नवीन विमानतळासाठी आवश्यक जमीन महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने संपादीत करण्यात आलेली आहे. त्यात 49 टक्के वाटा महाराष्ट्र सरकारचा, तर  51 टक्के भारत सरकारचा आहे, जो अद्याप अंतिम झालेला नाही. या योजनेस अंतिम स्वरूप देण्याची बाब अद्याप प्रलंबित आहे. संबंधित अधिकाऱ्यांना या समस्येकडे लक्ष देऊन आणि उर्वरित प्रक्रिया जलद करण्यासंबंधी लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे. 

सध्या सोलापूरच्या नागरिकांना विमान प्रवास करण्यासाठी कलबुर्गी, पुणे, मुंबई व हैदराबाद आदी ठिकाणी जावे लागत आहे. शेजारच्या कलबुर्गीहून बंगळूर, तिरुपती बालाजी आदींसह अनेक ठिकाणी सेवा मिळत आहेत. पण, सोलापूरला निकडीची गरज असूनही अनंत अडचणींमुळे विलंब होत आहे.

या भेटीनंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, बोरामणी विमानतळाबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, सोलापूर खासकरून अक्कलकोट तालुक्याशी माझे ऋणानुबंध आहेत. यामुळे मी विमातळाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करेन. अशी ग्वाही शिंदे यांनी या भेटीत दिली. दरम्यान येत्या काळात विमानतळासंदर्भाने मी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.  

Related Stories

No stories found.