आमदार भारत भालकेंनी होडी चालवत केली पुराची पाहणी 

आमदार भालके आपल्या वेगळ्या स्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असतात. आज त्यांनी पुराच्या पाण्यात होडी चालवून आपले वेगळेपण दाखवून दिले.
MLA Bharat Bhalke inspected the flood while driving a boat
MLA Bharat Bhalke inspected the flood while driving a boat

पंढरपूर : सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीला महापूर आला आहे. पुरामध्ये शहरातील अनेक दुकाने आणि घरे पाण्यात गेली आहेत. यामध्ये स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील अनेक रस्त्यावर पाणीच... पाणी झाले आहे. ज्या रस्त्यावरून गाड्या धावतात, त्याच रस्त्यावर आज (ता. 16 ऑक्‍टोबर) होड्या चालवल्या जात होत्या. 

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनीही आज चक्क होडीचे तराफे हातात घेत स्वतः होडी चालवली. होडी चालवतच पंढरपूर शहरातील पूरस्थितीची पाहणी केली. आमदार भालके यांनी होडी चालवून पुराची पाहणी केल्याचा व्हिडिओ आज सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

मागील चार दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यातच उजनी धरणातून सुमारे 2 लाख 25 हजार, तर वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीला महापूर आला आहे. महापुरामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवाय पंढरपूर शहरालाही मोठा तडाखा बसला आहे. 

पंढरपूर शहर व तालुक्‍यातील 440 घरांची पडझड झाली आहे. एकट्या पंढरपूर तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे सात जणांचे बळी गेले आहेत. आतापर्यंत 16 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी गुरुवारी (ता. 15 ऑक्‍टोबर) पंढरपुरात येऊन नदीकाठच्या भागात पाहणी केली. त्यानंतर आज पंढरपूरचे आमदार भालके यांनी प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्यावर होडी चालवून पूरस्थितीची पाहणी केली. या वेळी त्यांनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. 

या वेळी त्यांनी पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या घराचे आणि दुकानांचे पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना संबंधीत विभागाला दिल्या. आमदार भालके आपल्या वेगळ्या स्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असतात. आज त्यांनी पुराच्या पाण्यात होडी चालवून आपले वेगळेपण दाखवून दिले. 

Edited By vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com