सोलापूरमधील भाजपच्या दोन माजी मंत्र्यांमध्ये विसंवाद

सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष, दोन माजी मंत्री तथा विद्यमान आमदारांनी याबाबत वेगवेगळी मते व्यक्‍त करीत दोघांमधील विसंवाद पुन्हा एकदासदाखवून दिला.
miscommunication in two ex minister in solapur bjp agitation
miscommunication in two ex minister in solapur bjp agitation

सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दोन लाखांची कर्जमाफी दिली. राज्यातील 15 लाख शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित आहेत. लॉकडाऊमुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसून त्यांना आता बॅंकांकडून कर्जही मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने आजपासून (ता. 22) राज्यभर आंदोलनास सुरुवात केली आहे. मात्र, सोलापुरातील दोन माजी मंत्री सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांच्यात आंदोलनाबाबत विसंवाद दिसून आला. 

कर्जमाफीस पात्र असतानाही ज्यांना लाभ मिळालेला नाही, त्या शेतकऱ्यांना बॅंकांनी पीक कर्ज द्यावे. सदर रक्‍कम सरकारकडे येणेबाकी दाखवावी, असेही स्पष्ट केले. मात्र, बहूतांश शेतकऱ्यांना बॅंकांकडून कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी, पीक कर्जही त्यांना वितरीत करावे, यासाठी भाजपने आंदोलनास सुरवात केली आहे. त्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. 21) केली. मात्र, सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष, दोन माजी मंत्री तथा विद्यमान आमदारांनी याबाबत वेगवेगळी मते व्यक्‍त करीत दोघांमधील विसंवाद पुन्हा एकदास दाखवून दिला. 

काय म्हणाले दोन्ही माजी मंत्री.... 

पीक कर्जवाटपाबाबत मंगळवारी (ता. 23) जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांसह बॅंकाना निवदेन देण्यात येणार आहे. बॅंकेनी कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन, तातडीने पीक कर्ज द्यावे. अन्यथा आंदोलन करण्यात येणार असून, त्याचे निवेदन दिले जाणार आहे. 
-सुभाष देशमुख
आमदार, माजी सहकारमंत्री 


सोलापूर जिल्ह्यात आंदोलन करण्याबाबत अजून कोणतेच पत्र अथवा तारीख पक्षाकडून आलेली नाही. त्याबाबत मला काही कल्पना नसून आमच्या जिल्हाध्यक्षांकडून माहिती घेतो. त्यानुसार आंदोलन केले जाईल. 
-विजकुमार देशमुख, आमदार माजी राज्यमंत्री 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा रविवारी (ता. 21) रात्री उशीरा ई-मेल आला आहे. पीक कर्ज आणि कर्जमाफीबद्दलचे हे आंदोलन पुढील पंधरा दिवस चालवायचे आहे.  त्यानुसार आज तालुकाध्यक्ष, मंडल आधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन कर्जमाफी आणि पीक कर्जदेण्याचे लेखी आश्‍वासन घेतले जाईल. 
-शहाजी पवार, भाजप जिल्हाध्यक्ष

उद्धव ठाकरेंचे सरकार 'महाभकास': चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा आदेश नाही. शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात नाही, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार महाभकास सरकार ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली.  शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज मिळावे, बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच, शेतकऱ्यांना जाहीर झालेली कर्जमाफीची रक्कम तात्काळ मिळून त्यांना कर्जमुक्त करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे मुक निदर्शने केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com