जातीपातीचे राजकारण करणारांनी विकासाच्या खोट्या गप्पा मारल्या : भरणेंचा पाटलांना टोला 

काही मंडळींनी तर आम्ही केलेला विकास पचत नसल्याने स्वतः काही न करता मते घेण्यासाठी जातीपातीचे विष पेरण्याचे काम चालवलेले आहे.
Minister of State Dattatreya Bharane criticizes former Minister Harshvardhan Patil
Minister of State Dattatreya Bharane criticizes former Minister Harshvardhan Patil

नीरा नरसिंहपूर (जि. पुणे) : ‘‘निवडणुकीत मतांसाठी जातीपातीचे राजकारण करणारांनी विकास कामांच्या खोट्या गप्पा मारून सत्ता उपभोगली. अशांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही,’’ अशा शब्दांत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी नाव न घेता माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. (Minister of State Dattatreya Bharane criticizes former Minister Harshvardhan Patil)

इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील कार्यक्रमात राज्यमंत्री भरणे बोलत होते. या वेळी माजी सभापती प्रशांत पाटील, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, दत्तात्रेय घोगरे, नवनाथ रूपनवर, सागर बाबा मिसाळ, श्रीकांत बोडके, नागेश गायकवाड, प्रशांत सिताफळे, पांडुरंग डिसले, दादा क्षीरसागर, नरहरी काळे, आनंद कोळी, अरूण भाऊ कोळी आदी उपस्थित होते. 

भरणे म्हणाले की, तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या विकासासाठी लागणारा निधी कमी पडून देणार नाही. नीरा व भीमा नद्यांवर मोठे पूल, बंधारे, घाट, उजनी धरणावरील पिण्याच्या पाणी योजना, दवाखाना, पोलिस ठाणे, बस स्टँड, अंतर्गत रस्ते, गटार, वीज आदी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ही कामे वर्षभरात पूर्ण होऊन उत्कृष्ट तीर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूर म्हणून उदयास येणार आहे.

सर्वसामान्य गोरगरिबांना मदतीचा हात दिल्यास त्याचे ऋण ते आयुष्यभर विसरत नाहीत. मात्र, मोठ्या लोकांना कितीही द्या, त्याचे समाधान कधीच मिळत नाही. काही मंडळींनी तर आम्ही केलेला विकास पचत नसल्याने स्वतः काही न करता मते घेण्यासाठी जातीपातीचे विष पेरण्याचे काम चालवलेले आहे. मात्र, जनता अशा गोष्टींना भिक न घालता विकास कामांना प्राधान्य देणारांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास मंत्री भरणे यांनी व्यक्त केला.
 
नीरा नरसिंहपूरमधील विकास कामांमुळे सर्वच व्यवसायाला चांगले दिवस येतील. भविष्यात पर्यटक व भाविकांच्या ओघाचा फायदा तरुणांनी करून घ्यावा, असेही आवाहन मंत्री भरणे यांनी केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रेय कोळी यांनी, तर सूत्रसंचालन आनंद काकडे यांनी केले. नरहरी काळे व जगदीश सुतार यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com