आमदार समाधान आवताडेंचा बैठकांचा धडाका 

तो भविष्यात देखील कायम राहावा, अशी अपेक्षाव्यक्त होत आहे.
Meetings for pending questions taken by newly elected MLA Samadhan Avtade
Meetings for pending questions taken by newly elected MLA Samadhan Avtade

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पंढरपूर (Pandharpur) विधानसभेचे जागा भारतीय जनता पक्षाने प्रथमच ताब्यात घेतल्यामुळे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Avtade) यांनी प्रलंबित प्रश्नासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. त्यातून कोरोनाबरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्नही मार्गी लावण्याचे आमदार आवताडे यांचे प्रयत्न आहेत. (Meetings for pending questions taken by newly elected MLA Samadhan Avtade)

विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागताच पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघातील वाढत्या कोरोनाबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्याच्या व आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात आमदार आवताडे यांनी सूचित केले. त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन मतदारसंघातील कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णाला औषधे मिळणे, संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी चाचण्यांचे कीट उपलब्ध करून द्यावे. दोन्ही तालुक्यांतील नागरिकांचे लसीकरण वेगाने व्हावे यासारख्या मागण्यांचे निवेदन दिले होते. 

कोरोनाचे साहित्य, लस, व इतर बाबतीत सोलापूर जिल्ह्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात भाजप आमदारांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आंदोलनदेखील करू शकतो, हे यातून दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर मंगळवेढा येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेऊन आरोग्य खात्याने व महसूल खात्याला तालुक्यांमध्ये उपाय योजना करण्यासंदर्भात लक्ष घालण्यास सांगितले. 

सध्या लाॅकडाऊनमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना बँकांचे कर्जाचे हप्तेही भरणे मुश्कील झाले आहे. वारंवारच्या नियम बदलांमुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करणेदेखील कठीण झाले आहे, त्यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रलंबित बसवेश्वर स्मारकाचा विषय मार्गी लावण्यास संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. 

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या संदर्भात पंढरपूर येथील आंदोलनात देखील ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे सद्यस्थितीला नवनियुक्त आमदार समाधान आवातडे यांनी कामाचा धडाका लवला आहे. तो भविष्यात देखील कायम राहावा, अशी अपेक्षा मंगळवेढा तालुक्यातील जनतेमधून व्यक्त होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com