भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केल्यानेच जयदीप तावरेंना गोळीबाराच्या गुन्ह्यात अडकवले 

राष्ट्रवादीच्या दोन गटातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
A meeting was organized in Malegaon to protest against the arrest of Jaideep Taware
A meeting was organized in Malegaon to protest against the arrest of Jaideep Taware

माळेगाव (जि. पुणे) : पोलिस अधिकाऱ्यांनो, गोळीबार प्रकरणात खऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. पण, राजकीय आकसापोटी निरापराध व्यक्तीचा बळी घेऊ नका, अशी मागणी करत माळेगावमधील अनेक कार्यकर्त्यांसह महिलांनी एकत्र येत माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक झाल्याच्या घटनेचा निषेध केला. तसेच, व्यापाऱ्यांनीही तावरे यांच्यावर झालेली पोलिस कारवाई मागे घेण्यासाठी सकाळी दोन तास आपली दुकाने बंद ठेवली होती. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करणे, पोलिसांच्या दृष्टीने आणखी आव्हानात्मक ठरत चालले आहे. (A meeting was organized in Malegaon to protest against the arrest of Jaideep Taware)

दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या दोन गटातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रविराज तावरे यांच्या जबाबावरून माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक झाल्याने आज त्या घटनेच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली. त्यात गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केल्यानेच जयदीप यांना या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करण्यात आला.

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथील राष्ट्रवादीचे कायकर्ते रविराज तावरे यांच्यावर ता. ३१ मे रोजी गोळीबार झाल्याने पोलिसांनी सुरुवातीला चार आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) गुन्हा दाखल केला होता. तसेच, संबंधित आरोपींना पोलिसांनी अटकही केली होती. पण, जखमी रविराज यांच्या प्रकृतीत सुधारणा होताच पोलिसांनी या गुन्ह्याबाबत त्यांचा जबाब नोंदविला. त्यात त्यांनी जयदीप तावरे हे गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या कटकारस्थानात सहभागी होते, असा उल्लेख केल्याने पोलिसांनी जयदीप तावरे यांना मंगळवारी (ता. ६ जुलै) अटक केली होती. त्यानंतरच्या कालावधीत गावात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

‘‘रविराज तावरे यांनी गाळीबार प्रकरणात राजकीय आकसापोटी जयदीप तावरे यांच्या विरुद्ध खोटा जबाब दिला आहे. त्या घटनेची शहानिशा न करता पोलिसांनी जयदीप यांच्याविरुद्ध केलेली पोलिस कारवाई अन्यायकारक आहे. या घटनेला वाचा फोडण्यासाठी आज निषेध सभा घेतली आहे,’’ अशी माहिती बाजार समितीचे माजी सभापती धनवान वदक यांनी निषेध सभेत सांगितली. 

‘‘माळेगाव ग्रामपंचायतीवर सहा महिने प्रशासकाचे नियंत्रण होते. त्या कारभारात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्याच्या पतीचा हात आहे. सरकारी पातळीवरून या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी  केल्यानेच जयदीप तावरे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झालेला आहे,’’ असा आरोप राजेंद्र तावरे यांनी केला. या निषेध सभेत माजी सरपंच दीपक (बापू) तावरे, रणजित तावरे, दत्तात्रेय येळे, शिवराज जाधवराव, दादा जराड, रुक्मिणी लोणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

गोळीबार प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करावा : दीपक तावरे
माळेगावमध्ये रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाला, ही गोष्ट निंदनिय आहे. या गोळीबार प्रकरणात सुरवातीला पकडलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. त्याबाबत कोणाचेच दुमत नव्हते;परंतु राजकिय आकसापोटी जयदीप तावरे यांना अटक झाल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ही तणावाची स्थिती संपविण्यासाठी खरेतर पोलिसांनी निःपक्षपातीपणे गोळीबार प्रकरणाचा तपास करावा. गावकरी म्हणून आम्ही गावात शांतता बाळगतो, अशी भूमिका दीपक तावरे यांनी स्पष्ट केली. 
 
पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे 

माळेगाव गोळीबार प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस पुढे जात असताना गावात मात्र तणावाची स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. त्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे. कोणावरही विनाकारण अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही घेत असून तशापद्धतीने गोळीबार प्रकरणाच्या तपासाची दिशा पुढे जात आहे. गावकऱ्यांनी सहकाऱ्यांची भूमिका ठेवावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com