रत्नागिरी जिल्ह्याचा लॉकडाऊन 15 जुलैपर्यंत वाढवला

अनेक ठिकाणी रुग्णांना कोणताही प्रवासाचा इतिहास नसतानाही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढू लागली आहे.
lock down of ratnagiri district is extended by week collector says
lock down of ratnagiri district is extended by week collector says

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी 'मिशन ब्रेक द चेन' अंतर्गत 15 जुलैपर्यंत लॉकडाउनची मुदत वाढविण्यात आली आहे. या कालावधीत पूर्वीच्या लागू असलेले निर्बंध पुढील आठवडाभर लागू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणत होऊ लागला आहे. ब्रेक द चेन या मिशनअंतर्गत जिल्ह्यात 1 ते 8 जुलै या कालावधीत कडक लॉकडाउन करण्यात आले, मात्र या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. 25, 32, 40, 56 असे रुग्ण सापडले. आज जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 813 वर गेली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना कोणताही प्रवासाचा इतिहास नसतानाही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढू लागली आहे. आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा परिस्थिती पाहून लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत निर्णय होणार होता. त्यानुसार आज आठ दिवस पूर्ण होत असताना कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आणखी एक आठवडा म्हणजे 15 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सात दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे. यावेळेत अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही, जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात येणार असून सीमाही पूर्णपणे बंद राहणार आहेत. या काळात संपूर्ण दुकाने, चारचाकी वाहने, दुचाकी, वाहने, रिक्षा आदींना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. फक्त अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने, दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने व अत्यावश्‍यक गोष्टी सुरू राहतील. या काळात खासगी ऑफिसेस पूर्णपणे बंद राहणार असून सरकारी कार्यालयात फक्त दहा टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. बॅंका व पोस्ट सेवा सुरू राहणार आहेत. तसेच कृषी संबंधीचे दुकाने सुरू राहणार आहेत. सध्या संध्याकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पूर्णपणे कर्फ्यू राहणार आहे.

वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. हा लॉकडाउन आज रात्रीपासून ते बुधवार (ता. 15) रात्री उशिरापर्यंत लागू राहणार आहे. नागरिकांनी घरी राहावे, सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी केले आहे.

पुढील सात दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे. यावेळेत अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com